Header Ads

डफळापूर | संचारबंदी चालू 4 दुकानावर कारवाई | गुन्हे दाखल होणार | ग्रामपंचायतीच्या पथकाची कारवाई 


 

डफळापूर : कोरोना विषाणूच्या प्रभाव रोकण्यासाठी डफळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने कबर कसली आहे.गावातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.

पुर्ण गावातील गटारी,सार्वजनिक ठिकाणी फोरिडॉल औषधे मारण्यात येत आहे.गावात अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19)प्रादुर्भाव रोकण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897ता.13/3/2020 पासून लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित करण्यात आल्याच्या 49नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

लोकांना अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त लोकांनी फिरू नये,परिस्थिती गंभीर आहे काळजी घ्यावी,असे आवाहन संरपच बालिकाकाकी चव्हाण व ग्रामसेवक एस.एस.कोरे यांनी केले.

 

 

बंदीनंतर उघडी असलेल्या चार दुकानदारावर कारवाई 

 

 

राज्यभरात संचार बंदी असतानाही डफळापूर काही दुकाने उघडण्यात आली होती.ग्रामपंचायतीच्या पथकाने अशा चार दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत प्रस्ताव पोलीसांना देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक एस.एस.कोरे यांनी दिली.

Blogger द्वारे प्रायोजित.