Header Ads

'करोना' डफळापूरचा गुरूवारचा बाजार रद्द | सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन

 


 


डफळापूर, वार्ताहर : 'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर डफळापूर येेथे भरणारा गुरूवारचा आठवडा बाजार रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एस.एस.कोरे यांनी दिली.


ग्रामविकास अधिकारी कोरे म्हणाले,राज्यभरात फैलाव झालेल्या 'कोरोना'साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी काढलेल्या आदेशाअन्वये डफळापूर येथील आठवडा बाजार,सार्वजनिक कार्यक्रम,यात्रा जत्रा ऊरूस रद्द करण्यात आले आहेत.त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी गर्दी,जमाव जमविण्यासह प्रतिबंध करण्यात आला आहे.नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगावी.किरकोळ आजारावरही शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.कोणतीही भिती बाळगू,नये खबरदारी म्हणून या उपाय योजना करण्यात येत आहे.नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन ग्रामसेवक कोरे यांनी केले.


Blogger द्वारे प्रायोजित.