Header Ads

जनता कर्फ्यु ; 100 टक्के प्रतिसाद : जत तालुका लॉकडाऊन ; रस्ते सुनसान




 

 

 


जत,प्रतिनिधी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी रवीवार (22 मार्च)रोजी पुकारलेल्या देशव्यापी जनता कर्फ्युच्या आवाहनला जत तालुक्यातील नागरिकांनी 100 टक्के प्रतिसाद देत जत शहरासह तालुक्यातील डफळापूर, संख,उमदी,माडग्याळ, शेगाव,बिळूर ही गावेही पुर्णत: लॉकडाऊन होती. रविवारी सकाळापासून अख्ख्या तालुक्यात अपवाद रस्त्यावर नागरिक,वाहने पहावयास मिळत होती.
रविवारच्या कर्फ्युच्या चर्चा आधीच रंगत होत्या.नागरिकांनी अत्यावश्यक खरेदी शनिवारी संध्याकाळीच उरकली होती. रविवारी सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठांचा भाग व सांगली रोडवरील कार्यालयासोरचा गजबजलेला भागही पूर्णपणे सुनसान होता. रस्त्यांवर पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत होत्या. तर चौकाचौकात वाहतूक पोलिसांसह खाकी वर्दीतले पोलिसही तैनात होते. रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला थांबवून तो कुठे व कशासाठी जात आहे याची चौकशी केली जात होती.जत शहरातील प्रमुख चौक कधी नव्हे एवढे बंद दिसले.ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव कमी असलातरी बाहेरून येणारे नागरिक वाढल्याने धोका वाढला आहे.तालुक्यात सुमारे दहा हजारावर नागरिक विविध नोकरी,रोजगाराच्या निमित्ताने देशभरातील शहरात वास्तवास आहेत.शहरातील कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने त्यांनी परतीचा मार्ग धरला आहे.त्यांच्यावर्ती लक्ष ठेवण्याची गरज आहे. आरोग्य विभागाची तालुका पातळीवरील यंत्रणा सतर्क दिसते.मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रे,ग्रामपंचायती गंभीर दिसत नाहीत.पुढील दिवसात सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

 

 

जत शहरातील मुख्य चौक,प्रमुख रस्त्यावर सामसुम होती.


 

 



 

Blogger द्वारे प्रायोजित.