Header Ads

डफळापूर | येथे भिषण आगीत 2 दुकाने जळून खाक | सहा लाखाचे नुकसान : जत तालुक्यातील दुसरी घटना

 

 

 

 


डफळापूर, वार्ताहर : जत तालुक्यातील डफळापूर येथील जत रोड नजिकच्या भास्कर अँटोमोबाईल व सुरेश हेअर सलून या दोन दुकांनाना अचानक आग लागली.अँटोमोबाईल दुकानातील ऑईल,ग्रीसमुळे आग भडकली,काही तरूणांनी टँकरच्या पाण्याने आग विझवली,मात्र आतील सुमारे सहा लाखाचा माल जळून खाक झाला.संचार बंदीनंतर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे,चोरी आगीच्या घटनामुळे दुकानदार भयभीत झाले आहेत.आगीत भास्कर पांडूरंग चव्हाण यांच्या अँटोमोबाईल व चारचाकी,दुचाकी स्पेअर्स पार्टचे दुकानातील ऑईल डब्बे,ग्रीस,दुचाकी,चारचाकी गाड्याचे साहित्य,रोख 17 हजार रूपये असा 4 लाखाचा माल जळून खाक झाला आहे. तर लगतच्या सुरेश महादेव कोरे यांच्या सलून दुकानालाही आग लागल्याने दुकानाची सुमारे एक लाख रूपयाचे साहित्य जळाले आहे.तलाठी अलका भोसले यांनी घटनेचा पंचनामा केला.दरम्यान संचारबंदीच्या काळातील आगीची ही दुसरी घटना आहे. चोऱ्या व आगीमुळे तालुक्यातील दुकानदार भयभीत झाले आहेत.

 

डफळापूर ता.जत येथील आगीत जळालेली दुकाने

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.