Header Ads

कोरोना संचारबंदी | पोलीसांना पत्रकारांच्याकडून नाष्ठा,जेवनाची सोय | उमदी येथील पत्रकार संघाचा उपक्रम






 

उमदी,वार्ताहर : राज्यभर कोरोनाचा प्रभाव वाढल्याने देशभरात संचार बंदी लागु झाली.तसेच आवश्यक सेवा वगळता सर्व हाँटेल,दुकाने,पानटपरी,चहाचे गाडे,नाष्टा सेंटर सर्व काही बंद झाले आहेत.रात्रनदिवस या संचारबंदीत काम करणाऱ्या पोलीसांना नाष्ठा,जेवणाची गैरसोय होत होती.त्यामुळे उमदी परिसरातील अनेक दानशूर व्यक्तीनी चहा,नाष्टा तसेच पोलिस ठाण्यातच सांयकाळच्या जेवणाची सोय केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी बंदोबस्त असलेल्या उमदी पोलीस ठाण्याच्या सर्व पोलिस कर्मचारी यांना उमदी येथील दानशूर लोकांनी सकाळी चहा-नाष्टा सायंकाळी जेवणाची सोय केली जात आहे.तसेच पोलिसांना मास्कचे ही वाटप करण्यात आले आहे. कोरोना या विषाणूने प्रत्येक गावात धुमाकूळ घातला आहे.गावात संचारबंदी वेळी लोकांना घरात थांबण्यासाठी,गर्दी टाळण्यासाठी लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम पोलिस कर्मचारी करत आहेत. प्रत्येक गावातील हॉटेल्स,चहाच्या टपऱ्या, खानावळी बंद आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना चहा-नाष्टा उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे.त्यामुळे पोलिसांच्या जेवणाची व चहा पाण्याची व्यवस्था उमदी येथील अनेक दानशूर व्यक्तीनी पुढाकार घेतला आहे.तसेच या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांना चहा नाष्टा व जेवण देण्याचा संकल्प अनेकांनी व्यक्त केला आहे.

 

                

उमदी येथील जेष्ठ पत्रकार मलकारी वायचळ व राहुल संकपाळ तसेच सर्व पत्रकारांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरू केला होता.त्याचबरोबर उमदी पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले.पुढेही हा उपक्रम राबविण्यात येते आहे.दानसूर लोक यासाठी पुढे येत आहेत.आतापर्यत मोदीन तांबोळी,बसवराज पाटील, रमेश हुन्नुर यांनी जेवन व नाष्ठाची सोय केली आहे.संचारबंदी संपेपर्यत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे राहूल संकपाळ यांनी सांगितले.

 

उमदी ता.येथील पोलीसांना नाष्ठा वाटप करताना राहुल संकपाळ




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.