Header Ads

जत | भेसळ दुधासाठी काळा पैसे गुंतविला | पडद्याआडून सावकारी : काळा पैसे मिळविलेले पंटरानी मिळविले कोट्यावधी   

 

भेसळ दुधासाठी काळ्या पैसे गुंतविले
 

पडद्याआडून सावकारी : काळा पैसे मिळविलेले पंटरानी मिळविले कोट्यावधी

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सुरु असलेल्या मोठ्या प्रमाणातील दुध व्यवसायात अनेक बोगस पैसे मिळविलेल्या पंटरकडून काळा पैसा गुंतवून भेसळखेरी सुरू असल्याची चर्चा आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी दुय्यम व्यवसाय म्हणून दुध व्यवसाय करत आहेत.त्यामुळे दुध मुबलक उपलब्ध होत असल्याने तालुक्यात विविध व्यवसायातून कर चुकवून मिळविलेले काळा पैसे लावण्याचे मोठे क्षेत्र म्हणून समोर आले आहे. कोणताही हिशोब कागदावर नसलेल्या या धंद्यात काळा पैसा व्हाईट करण्याचे उद्योग अनेकांनी चालू केले आहेत.त्यात भर म्हणून दुप्पट पैसे मिळविण्यासाठी हे काळ्या धंद्यातील पंटर शरीराला घातक असलेले रसायने मिसळून दुध बनविण्याचे उद्योग राजरोसपणे सुरू असल्याच्याही चर्चा आहे.तर दुसरीकडे शेतकऱ्यांना जनावरे घेण्यासाठी पैसे देतात.काही कारणाने शेतकरी पैसे फेटू न शकल्यास त्याला 10 टक्के दराने व्याजासह धमकावून वसूली केली जात असल्याचे समोर येत आहे.अशा पडद्याआडच्या सावकाराच्या भितीने काही शेतकऱ्यांनी गावे सोडल्याचे तर काहीच्या मालमत्ता या दुध धंद्यातील पंटरने बळकाविल्याची चर्चा आहे.एककीडे रात्र दिवस पोटाला पिळ देऊन जगण्यासाठी धडपडणारे शेतकरी मरणावस्थेत आहेत.तर काळा पैसा मिळविलेले पंटर कोटीचे उडाने घेत आहेत.याची स्वतंत्र यंत्रणा नेमून चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

 


 


Blogger द्वारे प्रायोजित.