Header Ads

जत-मुंचडी महामार्गाचे सिमेंट कॉक्रीटला तडे


 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जत ते मुचंडीदरम्यान गुहागर-विजापूर सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या महामार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र या कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.अमृतवाडी फाटा ते मुचंडी या गावादरम्यान सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे, घाईगडबडीत रस्त्याची कामे सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.सलग 15 फूट ते 40 फूट अंतरावर रस्त्याला तडे जाऊन रस्त्याला भेगा पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.रस्त्याबाबत लेखी तक्रार केली आहे. जत ते मुचंडी दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याला तडे जाऊन भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जा बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ; या महामार्गाच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी ध्रुव कन्सल्ट या कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र या कंपनीचे अधिकारी इकडे आलेच नाहीत,अन्यथा जत-मुचंडी या रस्त्यावर पडलेल्या भेगा दुरुस्त कधीच दुरुस्त झाल्या असत्य असे अनेक वाहनधारकांचे म्हणणे आहे.आहे. या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्यापासून कामाच्या दर्जाबाबत मनमानी होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी मुंबईतील राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तक्रार केली आहे.

 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.