Header Ads

अंकलगी | करांचे 18 मार्चला पाण्यासाठी उपोषण


 

संख,वार्तहर : अंकलगी ता.जत येथे तीव्र  पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांची पाण्याअभावी होरफळ होत आहे.संतप्त नागरिकांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे.ग्रामपंचायतीने गेले पंधरा दिवसापुर्वी टँकर मागणीचा प्रस्ताव देऊनही अद्याप टँकर मिळाला नाही.त्यामुळे दिनांक 18 मार्च 2020 रोजी संख अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण इशारा नागरिकांनी दिला आहे.गेल्या पंधरा दिवसापासून अंकलगीतील सर्व पाणी स्रोत आटल्याने नागरिकांचे बेहाल होत आहे. गावशिवारावरील पाणतळावर ग्रामस्थांना पायपीठ करावी लागत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.