Header Ads

उमदी,संख परिसरात पुन्हा जुगार अड्डे बहरले | सर्वांना हप्त्याची सोय : सर्वच सामिल कोन करणार कारवाई


जत,प्रतिनिधी : उमदी पोलीस ठाणे हद्दीतील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डे पोलीसांना लाखो रूपये हप्त्याचे बळ देत असल्याने पुन्हा बहरले आहेत.अगदी पोलीस ठाण्याच्या जवळपास असलेला तीन पानी जुगार अड्डा कारवाईच्या भितीने हलविण्यात आला आहे. त्याचे ठिकाण लमाणतांडा रोडवर बदलले आहे.तेथेही पुर्वीचा एक जूगार अड्डा आहेच.त्याशिवाय कोतेंबोबलाद पासून उमदीपर्यत तर माडग्याळ पासून गिरगाव पर्यतच्या अनेक गावात सुमारे पन्नास जुगार अड्डे अगदी राजरोसपणे सुरू आहेत.या अड्डे चालकांकडून उमदी पोलीसांना 25 हजार ते एक लाख पर्यत महिन्याला हप्ता पोहच केला जात असल्याची चर्चा आहे.त्याशिवाय विशेष पथके,वरिष्ठ कार्यालयांना बिनचुक हप्ते बाजीने गरिबांची घरे उद्धवस्त करण्याचे प्रकार शासनाने कायदा-सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी नेमलेल्या पोलीसाकडून होत आहे. सिमावर्ती भागात जवळपास सात आंतरराष्ट्रीय जुगार अड्डे सुरू आहेत.तेथे महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक बडे नेता, व्यवसायिक, सावकारी,शेतकरी,अधिकाऱ्यांचा या अड्ड्यावर राबता असतो.यात दररोज दहा लाखापर्यत उलाढाल होत असल्याची नुसती चर्चा नव्हे,यापुर्वी झालेल्या कारवाईत उघड झाले आहे.अड्ड्यावर अगदी व्हीआयपी सुविधा पुरवली जात आहे.व्याजाने पैसे, व्यसनाचे सर्व व्यवस्था,अगदी बारबाला पुरविणा पर्यत गंडगड जुगाऱ्यांचे शौक पुरविले जात असल्याची चर्चा आहे.या जुगार अड्डे चालकांकडून वसूलीसाठी ठाण्याचे विशेष दोन कर्मचारी नेमल्याची चर्चा आहे.




 




 






Blogger द्वारे प्रायोजित.