Header Ads

सुनिलबापू व शैलजा चव्हाण दुहेरी खून प्रकरण | परशुराम हिप्परगीस आजन्म कारावास


सांगली :  डफळापूर ता.जत येथील कॉग्रेस नेते सुनिलबापू व शैलजा चव्हाण या दुहेरी खून प्रकरणी आरोपी परशुराम रामचंद्र हिप्परगी याला आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.जानेवारी 2015 रोजी झालेल्या या खून प्रकरणाने खळबंळ उडाली होती.
सांगली जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष व जत पंचायत समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते सुनील रामचंद्र चव्हाण (वय 54) व त्यांची पत्नी शैला सुनील चव्हाण (वय 47)यांचा डफळापूर-कोकळे रस्त्यावरील चव्हाण यांच्या मळ्यातील बंगल्यात घडली.आरोपी परशूराम हिप्परगी यांने धारदार हत्याराने वार करून मध्यरात्री निर्घृण खून केला होता.घटनेनंतर परशूराम हिप्परगीला ताब्यात घेत आरोपपत्र दाखल केले होते.
तब्बल पाच वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला.सांगली येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.2 आण्णासो पाटील यांचेसमोर हा खटला चालला. आरोपी परशुराम रामचंद्र हिप्परगी वय 43, रा.बेरडहट्टी, ता.अथणी, जि. विजापूर यास सुनील चव्हाण व त्याची पत्नी शैलजा चव्हाण यांचा खून केल्याप्रकरणी भा. दं. वि. स. कलम 302, 452,379 अन्वये दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षा तर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता उल्हास जयकुमार चिप्रे यांनी काम पाहिले.
थोडक्यात हकीकत अशी की,जानेवारी 2015 गुन्हा मयत कॉग्रेस नेते सुनीलबापू चव्हाण यांचे डफळापूर येथील मळयातील बंगल्यात घडला होता. आरोपी परशुराम रामचंद्र हिप्परगी हा यातील सुनीलबापू चव्हाण यांचे घरी सालाने घरगडी म्हणून काम करीत होता.त्यासाठी त्याने सुनीलबापू चव्हाण यांचेकडून रक्कम रुपये पन्नास हजार आगाउ उचल देखील घेतली होती व तो सुनील चव्हाण यांचे बंगल्याच्या कंपाउंडमध्येच रहात होता.मात्र हिप्परगी यास दारुचे व्यसन होते.त्याला सुनील चव्हाण यांनी दारु न पिणेबाबत समजावून सांगितले होते. तरी देखील त्याचे वागण्यात बदल होत नव्हता.एके दिवशी आरोपी हा दारु पिवुन आल्याने सुनील चव्हाण यांनी त्यास रागविले होते. त्याचा आरोपीने मनात राग ठेवुन दिनांक 19 जानेवारी 2015 रोजी रात्री सुनीलबापू चव्हाण व त्यांची पत्नी शैलजा चव्हाण हे त्यांच बंगल्यातील बेडरुममध्ये झोपले असता आरोपी परशूरामने बंगल्याचे दार उघडून आपल्या उजव्या हातात कोयता व डाव्या हातात विळा व कमरेला चेन घालून बेडरुमध्ये प्रवेश करुन हातातील कोयत्याने पहिल्यांदा सुनीलबापू चव्हाण यांचे मानेवर वार केला.परंतू त्यांची मान अजुन हलत असल्याचे पाहुन पुन्हा अरोपीने वार केला,असता सुनीलबापू चव्हाण हे जागेवर मयत झाले त्यानंतर त्याच कोयत्याने त्यांचे शेजारी झोपलेल्या सुनीलबापू यांच्या पत्नी शैलजा यांच्यावर देखील जोराने वार केला व पुन्हा सपासप वार करुन सुनीलबापू व त्यांची पत्नी शैलजा दोघांचे अंगावर जवळपास वीस ते पंचवीस वार केले व दोन्ही हत्यारे संडाच्या टाकीवरील फरशीवर काढुन ठेवली.त्यानंतर आरोपीने बांगड्या, मोबाईल इत्यादी वस्तु एका पिशवीत भरुन चारचाकी गाडी घेवुन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता परंतू गाडी बंद पडली. त्यानंतर पुन्हा त्यांने त्यांच्या अंगावरील कपडे काढुन घेतली व बंगल्याचे दार बंद करुन दरवाजाबाहेर आलेले रक्त कापडाने पुसून व सदरची कपडे बाथरुममध्ये पिळून किचनचा दरवाजा उघडून कपडे कोंबड्याच्या खुराड्यात टाकली.त्यानंतर दरवाजा बंद करत दरवाजाला बाहेरुन कुलूप लावली.घराची चावी कुंडीत टाकली.त्यानंतर आरोपी परशुराम मयत सुनील चव्हाण यांची मोटारसायकल घेवुन पसार झाला.आरोपी परशूरामने सुनीलबापू चव्हाण व त्यांची पत्नी शैलजा यांचा खून करुन मोटार सायकल व दागिन्यांची चोरी करत पळून गेला होता.दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता सुनीलबापू चव्हाण यांचे घरी दुध घालणारा रमेश तुकाराम आठवले याने कामासाठी सुनीलबापू यांचे शेतात गेल्यानंतर शेणघाण काढल्यानंतर त्याला बोलेरो गाडीला व बंगल्याच्या दाराला रक्त लागले,असल्याचे दिसले व बंगल्यास कुलूप असल्याचे दिसुन आल्याने त्यांनी सुनीलबापू चव्हाण यांचे भाऊ व नातेवाईकांना फोन करुन बोलावुन घेतले. बंगल्याच्या संडासच्या टाकीवरील फरशीवर विळा,कोयता अशी हत्यारे दिसुन आली.त्यानंतर महेशकुमार पतंगराव चव्हाण यांनी दिनांक  20 जानेवारी 2015 रोजी जत पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीच्या आधारे अज्ञात इसमाविरुध्द खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांनी केला.त्यांनी तात्काळ दोन्ही मृत्तदेहाचे इन्क्वेस्ट पंचनामा केला.मृत्तदेहाचे शवविच्छेदन करुन घेतले,आरोपीने गुन्ह्यात वापरलेली हत्यारे कोयता विळा इत्यादी शासकीय पंचासमक्ष जप्ती करत,घटनास्थळांचा पंचनामा केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वानपथक बोलाविले. घटनास्थळाजवळील जागेची पाहणी केली असता शेजारी असलेल्या डाळींबाच्या बागेतून मोबाईल जप्त करण्यात आला. त्यांनतर दिनांक 21 जानेवारी 2015 रोजी आरोपी परशूराम हिप्परगीस अटक करण्यात आली.त्यानंतर आरोपीने चौकशी दरम्याने निवेदन देवुन निवेदनाप्रमाणे त्याच्या साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी धरले. या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी उत्कृष्टरीत्या तपास करुन व पुरावे गोळा करत आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. यात जत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री.इनामदार यांनी मे. कोर्टाचे कामी मदत झाली तसेच पैरवी
कक्षाकडील पैरवी अधिकारी यांनीही आपल्या कर्तव्याची व्यवस्थीत बजावणी केली. आरोपी परशुरामने अमानुषरित्या निशस्त्र झोपेत असलेल्या माणसावर तीक्ष्ण हत्याराने वार खून त्यांचा निघृण खून केला आहे. तसेच या खूनामध्ये ज्या महिलेचा काही एक संबंध नसतानादेखील आरोपीने तिचा निघृण खून करुन अमानुष कृत्य केले आहे.अशा प्रकारे जिल्ह्यात या दुहेरी खून खटल्याने दहशत माजली होती.या सर्व गोष्टीचा विचार करून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
 
 19 साक्षीदारांचा साक्ष महत्वपूर्ण  
आरोपी हिप्परगी यांने बेरडहट्टी गावी लपवुन ठेवलेले साहित्य व मोटार सायकल काढुन दिले तसेच निवदेन पचनाम्याद्वारे गुन्हा करताना आरोपीने त्याचे अंगावर असलेली कपडे काढुन दिले. सदरची कपडे पंचनाम्याने जप्त करण्यात आली. सदरचा सर्व मुद्देमाल तपासणीकरीता न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथे
तपासणसाठी पाठविण्यात आला. यातील आरोपीने दिनांक 28/01/2015 रोजी पोलीसांना घटनास्थळी नेवुन गुन्हयाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. त्याचाही पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला हातो. आरोपीने दिनांक 04/02/2015 रोजी न्यायालयात कबुली जबाब देवुन आपण गुन्हा केल्याचे स्पष्ट शब्दात मान्य केले. गुन्हयाचा सखोल तपास केल्यानंतर तपासी अधिकारी यांनी आरोपीविरुध्द भक्कम पुरावे गोळा करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर केसची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश क्र.2आण्णासो पाटील यांचे
न्यायालयात सुरु होती. याकामी सरकारपक्षातर्फे एकुण 19 साक्षीदार तपासण्यात आले होते. सदर साक्षीदारांची तपासणी तत्कालीन अति. सरकारी अभियोक्ता अरविंद देशमुख यांनी नोंदविली. आरोपी यांने आपल्या बचावा दरम्यान खूनादिवशी तो घटनास्थळी नसलेबाबत व तत्पुर्वी तो 3 ते 4 दिवसापुर्वी त्याचे गावी यात्रेनिमित्त गेलेबाबत बचावात म्हटलेले होते व त्यासाठी त्याने दोन साक्षीदार तपासलेले होते. तसेच आरोपी याने आपण दिलेला कबुली जबाब आपणास मान्य नसल्याने बचावा दरम्यान कथन केलेले होते. मात्र आरोपीचे कत्य हे पुराव्यानिशी सिध्द झाल्याने मे. कोर्टाने त्यास दोषी धरलेले आहे. याकामी तकारदार महेश चव्हाण, योगेश व्हनमाने, डॉ.अभिजित चोथे व इतर पंचाची साक्ष महत्वाची ठरली. याकामी आरोपीचा कबुली जबाब नोंदविणारे न्यायाधीश शहाजी हणमंतराव साळुखे यांची साक्षही नोंदविण्यात आली. त्यांचीही साक्ष महत्वाची ठरली. तसेच जप्त केलेल्या हत्यारावर मयताचे रक्त असल्याचे न्यायसहायक प्रयोगशाळेकडील प्राप्त झालेल्या अहवालावरुन सिध्द झाले. तसेच घटनेच्या रात्री आरोपी हा मोटारसायकलवरुन पसार होताना पाहिलेले साक्षीदार यांची ही साक्ष महत्वाची ठरली. मयत सुनील चव्हाण हे एक सधन शेतकरी होते. सदर दुहेरी खूनामुळे संपूर्ण सागली जिल्हा हादरला होता व सदर खून खटल्याकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागुन राहिले होते.  


Blogger द्वारे प्रायोजित.