Header Ads

जत | शहरास ओडीएफ प्लस (हागणदारी मुक्त शहर) दर्जा प्राप्त |


जत,प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये जत शहराने ओडीएफ प्लस हा दर्जा प्राप्त केला आहे.




राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ओडीएफ प्लस हा दर्जा मिळविण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरविले होते.केंद्रशासनाने ओडीएफ प्लससाठी निर्गमित केलेल्या प्रोटोकॉल मधील अनिवार्य,आवश्यक, इष्ट व महत्वाकांशी निर्देशकांमधील बाबी जत नगरपरिषदे मार्फत पूर्ण करण्यात आल्या व केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या त्रयस्थ संस्थेमार्फत जत शहराची पाहणी पूर्ण झाली. त्याचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. सदर दर्जा प्राप्त झाल्यामुळे जत शहराची स्वच्छ सर्वेक्षण 2020 मधील कामगिरी व गुणांकन वाढण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. तरी सदर दर्जावर समाधान न बाळगता जत शहर हे ओडीएफ प्लस प्लस होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी पाऊल हे जत नगरपरिषदेकडून उचलण्यात येईल,असे मनोगत मुख्याधिकारी अभिजीत हराळे, नगराध्यक्षा शुभांगी बंनेनवर, उपनगराध्यक्ष आप्पासो पवार, स्वच्छता सभापती लक्ष्मण उर्फ टीम एडके, तसेच सत्ताधारी पक्षातील सर्व नगरसेवकांनी मांडले आहे.




 




 




स्वच्छेबाबतचा प्रयत्नाला यशजत शहरातील स्वच्छतेत यापुढील काळात सातत्य राखणे गरजेचे आहे. शहरातील शौचालये अद्यावत करून तेथे नागरिकांना उच्च दर्जाच्या सेवा पुरवल्या आहेत. याबाबतची पाहणी स्वच्छ सर्वेक्षण पथकाने केली असून त्यांनी जतला ओडीएफ प्लस प्लस दर्जा घोषित केला आहे. त्यामुळे यापुढील काळात शहरातील स्वच्छते संदर्भातील विकासकामे करण्यात येणार आहे.जत शहराला स्वच्छ, सुंदर बरोबर जिल्ह्यात आदर्श शहर बनविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
अभिजीत हराळे,मुख्याधिकारी



Blogger द्वारे प्रायोजित.