Header Ads

| कवटेमहाकांळ | मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी विज्ञानदिनी बनले वैज्ञानिक


 




मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी विज्ञानदिनी बनले वैज्ञानिक

 

 

कवठेमहांकाळ : मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सौ.मधुबाला दिपक बंडगर यांच्या शुभहस्ते झाले.संस्थापक मोहन माळी,सचिव सौ.नेहा माळी,अश्विनी माळी,वैशाली माळी,पीटीए मेंबर लक्ष्मी भोसले,कॉर्डिनेटर अरुण अब्राहम आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी कल्पकतेने विविध वैज्ञानिक उपकरणे तयार केली होती.हस्त कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार करणारे कला दालनही भरण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अशा कलाकृती तयार केल्या होत्या.विद्यार्थी स्वतः बनवलेल्या उपक्रमांची माहिती देत होते. त्यावरून विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्त होत होता.

सौ.मधुबाला बंडगर म्हणाल्या,मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल हे वैज्ञानिक  दृष्टिकोन असणारे शैक्षणिक संकुल असून,येथे भरवलेले विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती जोपासणारे आहे.भविष्यात या स्कूलचे विद्यार्थी वैज्ञानिक म्हणून देशभर चमकतील.

सचिव सौ.नेहा माळी म्हणाल्या,आम्ही स्कूलच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत.आमच्या स्कूलचे विद्यार्थी कोणत्याही गुणवत्तेत कमी पडणार नाहीत,अशी शिक्षण पध्दती आम्ही अवलंबली आहे.आज विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी संशोधन वृत्ती जोपासून निश्चितच वैज्ञानिक बनतील असा आशावाद व्यक्त केला. 

मनिषा तिवारी म्हणाल्या,बालक हा जगातील पहिला शास्त्रज्ञ असतो.

त्यांची अनुभूती विद्यार्थ्यांना करून देण्याचे काम मोहन माळी स्कूलमधून होते आहे.कलादालनासाठी कला प्रशिक्षक अमोल ओलेकर यांचे तर विज्ञान प्रदर्शनासाठी विज्ञान विषयशिक्षक अरुण अब्राहम  यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या हस्तकलेला आणि संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

मोहन माळी इंटरनँशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रदर्शन




 


Blogger द्वारे प्रायोजित.