Header Ads

| कोसारी | जळीग्रस्त खांडेकर कुंटूबियांना संभाजी टेंगले यांची मदत


 
 

 

कोसारीत जळीग्रस्त खांडेकर कुंटूबियांना संभाजी टेंगले यांची मदत

कोसारी, प्रतिनिधी : कोसारी ता.जत येथील रासप नेते संभाजी टेगंले आपल्या वाढदिवसाचा खर्च वाचवत दोन दिवसापुर्वी घर जळीत झालेल्या मच्छिंद्र भिमराव खांडेकर यांना आर्थिक मदत केला.

हे मुळचे निजामपूर येथील असलेले मच्छिंद्र खांडेकर यांची कोसारी येथे शेतजमीन घेऊन राहायला आले होते.राहते घर काडाच्या घरात राहत होते. त्यांच्या घराला अचानकपणे आग लागून जळुन खाक झाले होते.आगीत कपडे,भांडी,अन्नधान्य,संसार उपयोगी साहित्याचे सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांच्या नोटा जळुन खाक झाल्या आहेत.घरी आई, वडील,पत्नी तसेच दोन मुले कुटुंब आहे.या दुःखद घटनेने गावात सर्वञ हळहळ पसरली आहे. 

दरम्यान संभाजी टेगंले यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन वाचवित जळीतग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत केली,असून कुंटुबातील सर्व व्यक्तींना धीर देऊन त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला.गावातील सर्व व्यक्तींना त्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.त्या कुटुंबाचा पूर्वीसारखाच संसार जोडण्याचा हा प्रयत्न टेंगले यांनी केला.अन्य दानसूर लोकांनी अशा मदतीने मदत करावी,असे आवाहन यावेळी केले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,तानाजी बिसले सरपंच ग्रा.प.कोसारी,रासप तालुकाध्यक्ष किसन टेगंले,मेजर माणिक टेगंले,नवनाथ टेगंले, बबन वाघमोडे,सुनिल टेगंले, संजय वाघमोडे,सागर टेगंले आदी उपस्थित होते.

 

 

कोसारी येथील घर जळीतग्रस्त झालेले मच्छिंद्र खांडेकर यांना किसन टेंगले,विक्रम ढोणे व मान्यवर
 


Blogger द्वारे प्रायोजित.