Header Ads

| जत | दुर्मिळ औषधी वनसंपदा जपा : डाॅ. विनोद शिंपले 


 




 


दुर्मिळ औषधी वनसंपदा जपा : डाॅ. विनोद शिंपले

 

जत,प्रतिनिधी : भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असून अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजाना आहे. या दुर्मिळ औषधी वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने प्रामाणिक प्रयत्न करावा असे प्रतिपादन डाॅ. विनोद शिंपले यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत औषधी येथे दि.28 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, सायन्स असोसिएशन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत "औषधी वनस्पती: ओळख व संवर्धन" या एक दिवसीय कार्यशाळेत 'पश्चिम घाटातील औषधी वनसंपदा' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते.

डाॅ.शिंपले पुढे म्हणाले, हरितक्रांती व आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण अनेक नवनवीन संकरित जाती निर्माण केल्या.परंतु मुळचे वाण त्यामुळे नष्ट होत आहेत.तसेच वाढत्या लोकसंख्येच्या औषधी गरजा भागवण्यासाठी अनेक वनस्पतींचा बेसुमार वापर केल्यामुळे अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती कायमच्या नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे युवा पिढीने त्यांचे जतन करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा असे आवाहन केले.

डाॅ. ढेकळे म्हणाले की, शेती व निसर्ग यापासून आपण दूर चालल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यासाठी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून देशी भाज्या, पशुपालन व औषधी वनस्पती यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तरच मन-मेंदू-मनगट बळकट असलेली सशक्त युवा पिढी तयार होईल.

यावेळी वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजीत औषधी वनस्पती प्रदर्शन व रसायनशास्त्र विभागातील विविध विषयांवरील भित्तीपत्रिकेचे उद्घाटन डाॅ. शिंपले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी् प्राणिशास्त्र विभागाने प्रश्नमंजूषा, भौतिकशास्त्र विभागाने प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.

प्रास्ताविक डाॅ. राजेंद्र लवटे यांनी, सूत्रसंचालन कु. पूजा गडदे हिने तर आभार प्रदर्शन कु. पल्लवी माळी हिने केले. यावेळी डाॅ. शिवाजी कुलाळ, डाॅ. आप्पासो भोसले, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. श्रीकांत कोकरे, प्रा. मल्लापा सज्जन, प्रा. विजय जाधव, प्रा. संजय लठ्ठे, प्रा. दिपक कुंभार, प्रा. गोविंद साळुंके, कु. ममता जगताप, कु. विद्या माळी, कु. संगीता खोत, सौ. ललिता सपताळ, महाविद्यालय व परिसरातील शाळामधील विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.


 

 

 

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राजे रामराव महाविद्यालय, जत येथे 'औषधी वनस्पती: ओळख व संवर्धन' या एकदिवसीय कार्यशाळा व प्रदर्शन संपन्न झाले.



 


Blogger द्वारे प्रायोजित.