Header Ads

कुंभारी परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे : शेतकऱ्यांची मागणी
 


 

जत,प्रतिनिधी : म्हैसाळ सिंचन योजनेतून कुंभारी, कोसारी,धावडवाडी परिसरातील तलावात सोडावे,अशा मागणीचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना दिले.,या परिसरातील शेतकरी पाणीपट्टीचे पैसे भरण्यास तयार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. सध्या या परिसरातील तलावे,नालाबांध,बंधारे कोरडे पडले आहेत.त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शासनाने तातडीने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून या भागात पाणी सोडावे.युवक नेते नाथा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी विक्रम ढोणे,बाबासो खोत,योगेश गायकवाड,पोपट चव्हाण,नितिन सूर्यवंशी,संतोष माळी आदी जण यावेळी उपस्थित होते.
 

 

कुंभारी ता.जत परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे या मागणीचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देताना शेतकरी


 

  

Blogger द्वारे प्रायोजित.