Header Ads

उमदी स्टँड परिसरात सुसज्ज स्वच्छता गृह बांधावे 


 

 

उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथे बसस्टँड परिसरात स्वच्छता गृहाची  दुरावस्था झाली आहे.तातडीने येथे सुसज्ज स्वच्छता गृह बांधावे अशी मागणी होत आहे.उमदी हे कर्नाटक व महाराष्ट्रातील महत्वाचे गाव आहे.येथे पोलीस ठाणे,महसूल,कृषी विभागसह,ग्रामपंचायत अशी कार्यालये आहेत.परिसरातील गावातील लोकांचा येथे मोठी ये-जा असते.सध्या असणाऱ्या स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली आहे.त्यामुळे प्रवाशासह नागरिकांची गैरसोय होत आहे.त्यामुळे बसस्थानक परिसरात सुसज्ज स्वच्छता गृह बांधावे,अशी मागणी आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.