Header Ads

संख जि.प.शाळेत डुकरांचा वावर ; स्वच्छालय नादुरूस्त,जिर्ण इमारत,संरक्षक भिंत बांधावी
 
 

संख जि.प.शाळेत डुकरांचा वावर

 

स्वच्छालय नादुरूस्त,जिर्ण इमारत,संरक्षक भिंत बांधावी

 

जत,प्रतिनिधी : संख ता.जत येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भटक्या डुकराचा वावर वाढल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.
संख ग्रामसचिवालया लगत ही शाळा सुरू आहे.प्रांरभी वर्गाची कमतरता,जीर्ण इमारत,फुटके स्वच्छालय,डुंकराचा वावर असलेले किचन शेड शाळेचे शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्यासह जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे.स्वच्छता घराची प्रचंड दुरावास्था झाली आहे.आतील भांडे फुटले आहे.सर्वाधिक धोकादायक किचन शेडची आवस्था आहे.किचनशेड नजिक भटक्या डुकरांचा वावर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.गरिबाची शाळा असलेल्या जिल्हा परिषद शाळेकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याशिवाय शैक्षणिक दर्जाही सुमार असल्याचे समोर आले आहे.तातडीने शाळेचा दर्जा सुधारावा अशी मागणी पालकांतून होत आहे.दरम्यान शाळेला संरक्षक भिंत नसल्याने डुकरे थेट शाळेतील किचनशेड परिसरात धुडाळतात.अनेक वेळा आम्ही त्यांना बाहेर हाकलतो.मात्र ते परत परत येत आहेत. शाळेला संरक्षण भिंतबांधावी अशी मागणी आम्ही केल्याचे मुख्याध्यापक माळी यांनी सांगितले.

 

संख ता.जत येथील जिल्हा परिषद शाळेत डुकरांचा वावर धोकादायक ठरत आहे.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.