Header Ads

जतचे दिनकर पतंगे यांना महाराष्ट्रभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान


 


जतचे दिनकर पतंगे यांना महाराष्ट्रभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान


जत,प्रतिनिधी : जत येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना नेते व महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांना नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद या संस्थेने नांदेड येथे 'महाराष्ट्र भूषण जीवन गौरव' पुरस्काराने मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी खासदार हेमंतराव पाटील, दक्षिण नांदेड आमदार मोहन अण्णा हंबरडे, जय हिंद विद्यापीठ मुंबईचे कुलगुरू डॉ. बलदेव सिंह चौहान,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य देवदत्त तुंगार सर,नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री जयपाल उपस्थित होते. दिनकर पतंगे साहेब यांनी जत तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. ते स्वतः शिवसेनेतून समाजासाठी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करीत असून लोकांसाठी कायम झटत असतात.याचीच दखल घेऊन या संस्थेचे अध्यक्ष पाटील सर यांनी पतंगे यांना हा पुरस्कार दिला.

 

जतचे दिनकर पतंगे यांना 'महाराष्ट्रभूषण जीवन गौरव'पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.