Header Ads

बाबरवस्तीच्या चाळीस विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार


 




बाबरवस्तीच्या चाळीस विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्का

 

दोघा शिक्षकांचा 'महाराष्ट्ररत्न' पुरस्काराने सन्मान

 

जत,प्रतिनिधी : संख,ता.जत येथे शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त छञपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग,सलाम फांऊडेंशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसन मुक्त कुटूंबासाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ,गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे हे प्रमुख उपस्थित होते.

प्रंशात पिसाळ म्हणाले "व्यसन' हे आजकाल फॅशन झालेलं असून ती एक भारतीय समाजाला लागलेली कीड आहे.निरोगी आयुष्य जगण्यासाठी माणसानं निर्व्यसनी असणे ही एक आवश्यक बाब आहे. व्यसनापासून होणारे दुष्परिणाम आणि व्यसनाची दाहकता जर बालवयातच विद्यार्थ्यांना  समजली तर नक्कीच भविष्यात ही आजची पिढी निर्व्यसनी जीवन जगेल.

आर.डी.शिंदे म्हणाले,"व्यसनमुक्ती करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रबोधन करू,म्हणतात ना शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे याचा वापर करून आपण जग बदलू शकतो.शाळा छोटी असो किंवा मोठी त्या शाळेत दिले जाणारे शिक्षण,संस्कार हे विद्यार्थ्यांनाचे आणि देशाचे भवितव्य घडवत असतात,असेही शेवटी शिंदे म्हणाले.

व्यसनमुक्तीच्या कार्याबद्दल बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.जिल्ह्यातील पहिली शाळा आहे.महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यात बाबरवस्ती शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

परिजनाची व्यसन मुक्ती करण्यासाठी धडपडणारे विद्यार्थी अशी ओळख बाबरवस्ती या शाळेची झाली आहे.शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन,सकाळ माध्यम समूह आणि बजाज इलेक्ट्रिकल्स तर्फे परिजनाची व्यसनमुक्ती हा उपक्रम राज्यभर राबविला गेला.सलाम मुंबईचे प्रकल्प समन्वयक अजय पिळणकर,केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सविता मोटे,उपाध्यक्ष ललिता बाबर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले.सुञसंचलन अभिजीत माळगोंडे,तर आभार अनिल पवार यांनी मानले.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.