Header Ads

सोर्डीत जमिनीच्या वादातून एकाचे डोके फोडले | चौघाविरोधात गुन्हा दाखल


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सोर्डी येथे जमीन व रस्त्याच्या कारणावरून एकाला चौघाजणांनी काठीने मारहाण करून डोके फोडल्याची घटना सोमवारी घडली.याबाबत जखमी राजकुमार यल्लाप्पा व्हनमाने यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.सुभाष आणाप्पा व्हनमाने,काशिनाथ श्रीकांत व्हनमाने,महादेवी श्रीकांत व्हनमाने,रत्नाबाई तुकाराम कोरे यांच्याविरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सोर्डी गावात जखमी व संशयिताचे लगत जमिन आहे.त्यांच्यात जमीन व रस्त्याचा जूना वाद आहे.त्यातून सोमवारी जखमी राजकुमार व्हनमाने यांच्यात झालेल्या वादातून चौघा संशयितांनी काठीने डोक्यात मारहाण करून डोके फोडले आहे.याप्रकरणी संशयित चौघाविरोधात 325 कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.अद्याप कोणास अटक नाही.अधिक तपास विनायक शिंदे करत आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.