Header Ads

जतेत बंद घर फोडून 85 हजाराचा मुद्देमाल लंपास


 

जत,प्रतिनिधी : जत येथील शिवाजी पेठेतील अभय मारुती साळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 85 हाजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल लंपास केला.याबाबत जत पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी, अभय साठे कुंटुबिय रवीवारी कर्नाटकातील चिंचणी येथील मायक्कादेवी यात्रेसाठी गेले होते.यांचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत तिजोरीतील 53 गँम सोन्याचे दागिणे,रोख 5 हजार असा एकूण 85,हजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल लंपास केला.अधिक तपास पाटील करत आहेत.दरम्यान शहरात 


गेल्या तीन महिन्यापासून घरफोड्याच्या घटना वाढल्या आहे.बंद घरे चोरट्याच्या रडारवर आहेत.अनेक गुन्हे दाखल असूनही गुन्हे उघडीस येतच नसल्याने चोरट्यांचे बंळ वाढले आहे.पोलीसांनी जत शहरात सिंघम स्टाइल कारवाई करून चोरट्याच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.