Header Ads

उमदीत मटका एंजन्ट पकडला | 20 हजाराचा मुद्देमाल जप्त : एलसीबीची कारवाई

 

 

उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथील शिवाजी चौकात मटका घेणाऱ्या उमेश गिरमल्ला हुन्नुर यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने छापा टाकला.यात 19 हजार सातशे पंच्याहत्तर रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी, उमदीतील शिवाजी चौकात हुन्नूर मटका घेत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.त्याआधारे सोमवारी छापा टाकत रोख रक्कम 13 हजार,6 हजाराचा मोबाइल,व जूगाराचे साहित्य असा 19  हजार सातशे 75 रूपायाचा मुद्देमाल जप्त करत त्याला ताब्यात घेतले आहे. प्रंशात माळी यांनी फिर्याद दिली आहे.अधिक तपास एएसआय कोळी करत आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग बऱ्याच दिवसानंतर अवैध धंद्याविरोधात कारवाया सुरू झाल्या आहेत.गेल्या काही दिवसापासून यंत्रणेच्या बंळाने सोकावलेले अवैध धंदे चालकांना दणका बसत आहे.

 

 


लंवग्यात मटका घेणाऱ्या एकास अटक

 

उमदी,वार्ताहर : लंवगा ता.जत येथे शिवाजी यल्लाप्पा कांबळे रा.गिरगाव याला मटका चिठ्ठी घेताना पोलीसांनी पकडले.त्यांच्याकडे रोख रक्कम,मटका साहित्य असा 980 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजापूर-नगर हायवेलगत लंवगा हद्दीत उमदी पोलीसांनी हि कारवाई केली.श्रीशैल वळंसग यांनी फिर्यादी दिली आहे. अधिक तपास सचिनआटपाडकर करत आहेत.

 

 

.

Blogger द्वारे प्रायोजित.