Header Ads

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचे दागिणे पळविले


 

जत,प्रतिनिधी : जाधववाडी(वाळेखिंडी) ता.जत येथील महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिला मारहाण करत गळ्यातील मंगळसुत्र,घंटण व कानातील कृणफुले 

जबरदस्तीने काढून नेहल्याची घटना रवीवारी दुपारी दोनच्या दरम्यात घडली.याबाबत प्रभावती विठ्ठल जाधव(वय 50, रा.जाधववाडी)यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.


पोलीसांनी दिलेली माहिती अशी, जाधववाडी येथे राहणाऱ्या प्रभावती जाधव यांची घरापासून अर्ध्या किलोमीटरवर शेतजमीन आहे.रविवारी सकाळी पती विठ्ठल जाधव हे मोटर चालू करून आले होते.प्रभावती ह्या नात्यातील एका लग्न कार्याला जाणार होत्या.त्यामुळे सोन्याचे दागिणे त्यांनी घातले होते.मात्र पतीची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांनी लग्नासाठी जाण्याचे रद्द केले होते.दुपारी शेतातील मोटार बंद करून त्यात घराकडे येत असताना पाठीमागून एक दुचाकीवरून अनओखळी इसम आला.त्यांने सौ.जाधव यांना मसोबा मंदिर कुठे आहे,म्हणून विचारले.सौ.जाधव यांनी त्याला वाट सांगेपर्यत उभ्या इसमाने खिशातील चटणी सौ.जाधव यांच्या डोळ्यात टाकली.अचानक उद्भवलेल्या या घटनेने प्रभावती जाधव आराडाओरडा करू लागल्या,मात्र जवळचा परिसर निरमनुष्य असल्याने सौ जाधव यांच्या मदतीला कोन येऊ शकले नाही.इसमाने त्यांना मारहाण करत जबरदस्तीने गळ्यातील गंठण,मंगळसुत्र,कानातील कर्णफुले असे जवळपास 84 हजार रूपयाचे चार तोळ्याचे दागिणे काढून घेत पलायन केले.सौ.जाधव यांनी घरी येऊन पतीला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी जत पोलीसात धाव घेतली.पो.नि.राजाराम शेळके यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी करून तपास सुरू केला आहे.दरम्यान या भागात प्रथमच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.