Header Ads

एकुंडीत विकास कामांचा धडाका | रस्ता कामासाठी सरपंचांनी खेचून आणला लाखोंचा निधी




 


 

जत,प्रतिनिधी : सरपंच पदाची जबाबदारी घेतल्यानंतर सरपंच बसवराज पाटील यांनी एकुंडी येथे विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. सरपंच पदाची शपथ घेण्यापूर्वीच एकुंडीत स्वखर्चातून पाटील यांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करुन दिला होता. 

सोमवारी एकुंडीत विविध विकासकामांची भूमीपुजन माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.आमदार फंडातून गावठाण ते बसवेश्वर मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण,14 वा वित्त आयोगातून म्हेत्रेवस्ती ते गुड्डोडगीवस्ती शाळेपर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण, गुड्डोडगीवस्ती ते लठ्ठीवस्ती ओढा पात्रावर पूल बांधणे यासह लाखो रूपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले,एकुंडी गावातील जनतेने कायम आमच्या विचाराला साथ दिली असून या गावातील जनतेच्या मागणी नुसार बसवेश्वर रस्ता कामासाठी 18/19 या सालातील आमदार फंडातून 4 लाख निधी या रस्त्यासाठी मंजूर केला आहे. सरपंच बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून गावात विविध विकास कामे झाली आहेत.जत तालुक्यात एकुंडी गाव सध्या प्रगतीपथावर आहे.या गावाचा आदर्श तालुक्यातील प्रत्येक गावाने घेणे गरजेचे आहे. एकुंडी गावासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागा मार्फत नवबौध्द वस्ती विकास योजनेतून आजच 7 लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे,असेही विलासराव जगताप यांनी सांगितले. यावेळी आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, रासपचे जिल्हा संपर्क प्रमुख अजित पाटील, रासपचे जत शहराध्यक्ष भूषण काळगी, कुंभारीचे लोकनियुक्त सरपंच राजाराम जावीर,माजी सरपंच चिदानंद पाटील,सदाशिव शेगावे, सुरेश महाराज, सदाशिव कोरे, महानिंग म्हेत्रे, सिद्राम कोरे,मलगोंडा कोट्टलगी,अशोक शेगावे, राजू शेगणे, पिरगोंडा पाटील, दुर्योधन गुड्डोडगी, दुंडाप्पा शेगावे, हणमंत कांबळे, महादेवदादा पाटील,शशिकांत नाईक, रावसाहेब नाईक यांच्यासह बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता. याप्रसंगी एकुंडीचे जेष्ठ नागरिक भीमराव शेगावे यांनी विलासराव जगताप यांचा सत्कार केला.आभार सरपंच बसवराज पाटील यांनी मानला.

 

एकुंडी ता.जत येथील विविध विकासकामाचे भूमीपुजन माजी आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.


 

 



 

Blogger द्वारे प्रायोजित.