Header Ads

जतमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आंदोलन


 

 

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जत शहरातील पुतळ्याचे काम गेल्या चौदावर्षापासून रखडले आहेत.ते तातडीने करावे,या मागणीसाठी मंगळवार ता.18.फेंब्रुवारी रोजी युवा नेते विक्रम ढोणे हे शिवप्रेमी जनतेसह लक्षवेधी आंदोलन करणार आहेत.तसे निवेदन त्यांनी पोलीसांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,जत शहरातील छत्रपती शिवाजी चौकात जतची शान असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक पुतळा होता.तो एका ट्रक अपघातात पडला होता.या घटनेला 14 वर्षे झाली आहेत.तेव्हापासून नवा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे.त्यात पुतळ्याचा चबुतरा पुर्ण करण्यात आला आहे. मात्र चबुतऱ्यावर नियोजित अश्वारूढ पुतळा अद्यापपर्यत बसविण्यात आलेला नाही.महाराजांची सुरू असलेली उपेक्षा संपवून पुतळा पुन्हा सन्मानाने उभा करावा या मागणीसाठी शिवप्रेमी जनतेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाना शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ढोणे यांनी केले आहे.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.