Header Ads

| माडग्याळ | ग्रामीण रुग्णालचा कारभार प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे | रुग्णाचे हाल,खाजगी उपचार घेण्याची वेळ


 माडग्याळ ग्रामीण रुग्णालचा कारभार प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे  
 


 

माडग्याळ, वार्ताहर : माडग्याळ ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त जागा व अनेक विभाग बंद असल्याने उपचार मिळत नाहीत.रुग्णालयाचा कारभार प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे सुरू असल्याचा आरोप रूग्णांनी केला.शासनाने तातडीने ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे व सर्व विभाग सुरू करावेत अशी मागणी होत आहे.भल्या मोठ्या जत तालुक्यातील पुर्व  भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी तातडीने उपचार मिळावेत म्हणून माडग्याळ येथे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे.अनेक दिवसानंतर ते चालू झाले खरे,मात्र तेथे प्राथमिक केंद्राप्रमाणे उपचार मिळत आहेत.शस्ञक्रिया, एक्स रे सह अनेक विभाग बंद आहेत. त्याशिवाय येथे येणाऱ्या रुग्णावर उपचार मिळतीलच यांची श्वाश्वती नसल्याने कोट्यावधी रूपये खर्चूून बांधलेल्या रुग्णालया ऐवजी खाजगीत उपचार करावा लागत आहे. रूग्णालयात दोन वैद्यकीय अधिकारी,मेडिकल ऑफिसर,ज्यूनिअर लिपिक,कक्ष सेवक,शिपाईच्या जागा रिक्त आहेत.शवविच्छेदन विभागाची सोय येथे नाही,पाण्याची मोठा अडचण ग्रामीण रूग्णालयात आहे.बांळतपणासाठी महिलांना घरातून पाणी घेऊन येण्याची वेळ येत आहे.त्याशिवाय अत्यावश्यक 108 रूग्णवाहिकाही रूग्णालयाकडे नसल्याचे  रूग्णांनी सांगितले.प्राथमिक केंद्राप्रमाणे कारभार सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुधारावा अशी मागणी होत आहे. 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.