Header Ads

| जत | महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या जाहीरातीत धनगर समाजावर अन्याय


 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या जाहीरातीत धनगर समाजावर अन्याय

 

तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन  

 

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित,गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या परीक्षेस अर्ज करणेस स्थगिती द्यावी अशा मागणीचे निवेदन युवा नेते विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सचिन पाटील यांना दिले.यावेळी हिंदूराव शेंडगे,संभाजी टेंगले,राजू मुल्ला,सुरेश कोकरे,विकास गावडे,सुरेश कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनानने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची क्र एडीव्ही 3116/सी आर-69/2019/तीन जाहिराती क्र: 05/2020 ही जाहीरात प्रकाशित केली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या मार्फत सरळ सेवा - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित,गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी वरील जाहितीमध्ये उदा.गृहविभाग पोलीस

उपनिरीक्षक गट ब अराजपत्रित एकूण पदे 650 जाहिरात आलेली आहे. यामध्ये सामाजिक प्रवर्ग भटक्या जमाती क मध्ये फक्त 02 पदे आहेत.01 पद सर्वसाधारण व 01 पद महिला अशी जागा आहेत. भटक्या जमाती क व भटक्या जमाती ड या प्रवर्गासाठी आरक्षणच्या प्रमाणात जागा आलेल्या नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाणे जाहिर केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्रातील सामाजिक प्रवर्ग भटक्या जमाती क व ड यांच्यावरती अन्याय झालेला आहे. तरी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अर्ज करणेस स्थगिती करणेबाबत योग्य त्या सुचना करून सामाजिक 'प्रवर्ग भटक्या जमाती क व ड या प्रवर्गातील आरक्षणाच्या प्रमाणात वाढ करून नविन जाहिरात जाहिर करावी अशा सुचना देणेत यावी.महाराष्ट्रातील सामाजिक प्रवर्ग भटक्या जमातीतील विध्यार्थांची संख्या पाहता हा खुप मोठा

अन्याय आहे. विद्यार्थीचा सहनुभूतीपूर्वक विचार करून तातडीने या जाहिरातीस स्थगिती करून योग्य तो बदल करून नविन जाहिरात प्रसिध्द करावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

 

 

जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले.

 

 

 

 

 

 

 
 


Blogger द्वारे प्रायोजित.