Header Ads

मोहन माळी स्कूलमध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर


 
मोहन माळी स्कूलमध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर

 

  

 

कवठेमहांकाळ : मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल या शैक्षणिक संकुलात महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांची 389 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.

प्रांरभी मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.आयुष सुधाकर बंडगर यांने छत्रपती शिवरायांची तर अनुष्का विजय चव्हाण हिने जिजा मातेची आणि  वैष्णवी माळी हीने सईबाईची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लेझीम, झांज यांच्या साह्याने पारंपारिक नृत्य करीत शिवराय व जिजामाता यांचे स्वागत केले.शौर्यदीप चव्हाण या विद्यार्थ्यांने आपल्या भाषणातून शिवरायांचा इतिहास सांगितला.पी.जे. कलमडे यांनी छ.शिवरायांच्या जीवन कार्याची आणि आदर्श विचारांची ओळख तरुण पिढीला करून देणे हे आपले कर्तव्य आहे,असे सांगत उपस्थितांना शिवविचार दिले.लक्ष्मण कद्रे यानी छत्रपती शिवबांचे विचार मांडले. शिवरायांच्या विचारांनी व घोषणांनी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना वसमाले यांनी केले.संस्थापक मोहन माळी,सचिव नेहा माळी,को-ऑर्डिनेटर अरुण अब्राहम उपस्थित होते.

 

मोहन माळी इंटरनँशन स्कूलमध्ये शिवजंयती निमित्त साकारलेल्या प्रतिकृती
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.