Header Ads

डॉ.अमोल सारखे तरूण जतचे शैक्षणिक क्षेत्र उंचावतील : विक्रमसिंह सांवत


 





 

जत,प्रतिनिधी : डाॅ.अमोल यानी इंडीयन सोसायटी फाॅर व्हेटरनरी सर्जन या संस्थेकडून बेस्ट क्लिनिकल पुरस्कार मिळवून आपल्या दुष्काळी जत तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम केले आहे,असे प्रतिपादन जतचे आ.विक्रमसिंह सावंत यांनी केले. 

ते सुवर्ण व शिवनेरी मित्र मंडळ जत यांच्यावतीने येथील साईप्रकाश मंगल कार्यालय येथे डाॅ.अमोल यमगर यांच्या सत्कारानिमित्त आयोजित करण्यात कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी जतचे प्रसिद्ध दंतरोग तज्ञ व दि फ्रेंडस् असोसिएशनचे कार्याध्यक्ष डाॅ. मदन बोर्गीकर हे होते.

आ.सावंत म्हणाले पुढे की,डाॅ.अमोल हा प्राण्याचा डाॅक्टर झाला.त्याने अपार कष्ट व मेहनत घेऊन दुर्मिळात दुर्मिळ अशा प्राण्यावर अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून इंडियन सोसायटी फाॅर व्हेटरनरी सर्जन हा पुरस्कार मिळविला आहे. 

प्रमोद पोतनिस म्हणाले की, डाॅ.अमोल यानी प्राण्याच्या डाॅक्टर होऊन दुष्काळी तालुक्यातील युवकांपुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. डाॅ.अमोल हा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा आम्हाला त्याचा अभिमान आहे.

डाॅ.मदन बोर्गीकर म्हणाले, दुर्मिळात दुर्मिळ प्राणी कासवावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून प्राणी डाॅक्टरांच्या विश्वात एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.त्यांची दखल घेत इंडीयन सोसायटी फाॅर व्हेटरनरी सर्जन या संस्थेकडून बेस्ट क्लिनिकल पुरस्कार देऊन राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या अभ्यासावर डॉ.अमोल यांना पिएचडीही मिळाली आहे.

माजी प्राचार्य डाॅ.श्रीपाद जोशी,नगराध्यक्षा सौ.शुभांगी बन्नेनवर,काँग्रेसचेकार्याध्यक्ष सुजय उर्फ नाना शिंदे,माजी जि.प.सदस्य रमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते हाजी बंदेनवाज पटाईत, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रास्ताविक व स्वागत प्रा.चंद्रसेन मानेपाटील यांनी केले तर आभार शिवनेरी मित्र मंडळ जतचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुंभार यांनी मानले.

 

जत.येथील सत्कार सोहळ्यात बोलताना आ.विक्रमसिंह सांवत




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.