Header Ads

| जत |मराठी भाषा जतन व संवर्धन काळाची गरज : डॉ.व्ही.एस.ढेकळे


 




मराठी भाषा जतन व संवर्धन काळाची गरज : डॉ.व्ही.एस.ढेकळे

    

जत,प्रतिनिधी : मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून काळाची गरज असल्याचे मत प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांनी व्यक्त केले. ते जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून कवी रावसाहेब यादव उपस्थित होते.आपल्या भाषणात ते म्हणाले, जोपर्यंत गावागावामध्ये मराठी भाषा विविध बोलींमध्ये बोलली, लिहिली जाते, त्याद्वारे व्यवहार होतो तोपर्यंत तिला भीती नाही.कोणत्याही भाषेचा दर्जा हा त्यातील साहित्यावर ठरत असतो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व भेद विसरून एक व्हायला हवे, तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल. त्याचबरोबर त्यांनी बहारदार कविताही सादर केल्या. त्यामध्ये 'कसली लेका लोकशाही भाकरी सुद्धा देत नाही', 'महागाईने डोकं वर काढलं प्रपंच्याच ओझ त्याला नाही पेललं', 'शिक्षणाचा येथे बाजार भरला, बाप माझा बोलीत कमी पडला', या कवितांचा समावेश होता.स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा सुखदेव नरळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा अर्चना हिबारे यांनी तर आभार प्रा निर्मला मोरे यांनी व्यक्त केले. 

 

 

 




 


Blogger द्वारे प्रायोजित.