Header Ads

पुन्हा बेधडक अवैध वाहतूक सुरू | नियम ढाब्यावर,महिना पाचशे रूपयावर समेंट : कारवाई थंडबस्त्यात ?

जत,प्रतिनिधी : जत -सांगली मार्गावर नियमानुसार सुरू असलेली काळी-पिवळीसह प्रवाशी वाहतूक पुन्हा नियमबाह्यपणे धुमधडाक्यात सुरू झाली आहे.सिंघम कारवाईनंतर एका गाडीला पाचशे रूपये महिन्यासाठी हप्ता ठरविण्यात आल्याची चर्चा आहे.या मार्गावर दररोज 220 वाहनातून



प्रवाशी वाहतूक केली जात आहे.त्याला पाचशे प्रमाणे जत पोलीस ठाण्याला महिन्याला 1 लाख दहा हाजार रूपयाचा हप्त्याची रक्कम मिळणार आहे.या शिवाय अन्य विभागाचे वेगळे हप्ते ठरविण्यात आल्याचे निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे.





सर्वाधिक पैसे मिळवून देणाऱ्या अवैध वाहतूक व्यवसायाला पोलीसाकडून पाठबळ हे नवीन नाही.यापुर्वीही हप्ते घेऊन बेधडक वाहतूक सुरू होती.जत सांगली वगळता अन्य मार्गावर टपावर,जनावरे भरल्यासारखी प्रवाशी गाडीत कोबून वाहतूक होत होती.मात्र जत पोलीस ठाण्याचे परिवर्तन करण्याचा चंग बांधलेल्या एका अधिकाऱ्यांने काळी-पिवळी गाडीच्या चालकांना कायद्याचा बडगा उगारत नियमानुसार प्रवाशी भरून वाहतूक करण्याचा फतवा काढला होता.हे करताना एका काळी-पिवळी गाडीची काच फोडण्याचा प्रकार या अधिकाऱ्यांकडून झाला होता.दहा-पंधरा गाड्यावर कारवाईनंतर मात्र वाहन चालक, वसूली कलेक्टर,अधिकाऱ्यात समेट घडला असून महिन्याला पाचशे रूपये हप्ता ठरविण्यात आला आहे. त्यामुळे जत-सांगली मार्गावर बेधडक 12 ते 15 प्रवाशी कोबून वाहतूक करण्यात येत आहे.अवैध धंदे बंद करणार म्हणून भिमगर्जना करणाऱ्याचे इरादे आता स्पष्ट झाले आहेत.यानंतर हळूहळू बाकी धंदे सुरू करण्याची कारवाई काही मध्यस्थीच्या मार्फत सुरू असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.




Blogger द्वारे प्रायोजित.