Header Ads

जतला कृषी महाविद्यालय होण्याच्या आशा पल्लवीत | जिल्हा नियोजनच्या बैठकीत स्नेहलता जाधव यांच्या प्रश्नावर पालकमंत्री सकारात्मक


 



जत,प्रतिनिधी : जत येथे कृषी महाविद्यालय सुरू करावे या मागणीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक उत्तर दिले.कायम दुष्काळी व शहरालगत सुमारे 1100 हेक्टर जमिन असलेल्या जत तालुक्यात कृषी व पशूवैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजनच्या सभेत जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव यांनी केली.




त्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली.आमदार अनिल बाबर यांनीही पेठ येथे कृषी महाविद्यालय होण्याऐवजी जत सारख्या दुष्काळी तालुक्यात व्हावे अशी मागणी केली.यावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी हा विषय कँबिनेट पातळीवरील आहे.यावर कँबिनेट बैठकीत चर्चा करण्यात येईल.जतचा विषय मांडू अशी ग्वाही दिली.




राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला एक कृषी महाविद्यालय करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने जतलगत कँटलफार्म येथे सर्व सोयीसुविधा आहेत.मोठ्या प्रमाणात शासकीय जमिन,पाण्यासाठी तलाव,गीर गाईचा प्रकल्प,शेकडो वेगवेगळ्या वनस्पती या परिसरात आहेत.त्यामुळे येथे कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.त्याशिवाय जत सारख्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना यामुळे उच्चशिक्षण घेता येईल अशी माहिती स्नेहलता जाधव यांनी बैठकीत मांडली.दरम्यान पालकमंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जतला कृषी महाविद्यालय होण्याची आशा निर्माण झाली आहे.



Blogger द्वारे प्रायोजित.