Header Ads

गंधर्व नदीचा नाला | जतेत अजब प्रकार : एका बाजूने अतिक्रमणाचा विळाखा,दुसऱ्या बाजूने भराव टाकला

 


 जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणाऱ्या गंधर्व नदीचा नाला करण्यात आला आहे. एका पदाधिकाऱ्यांचा फायद्यासाठी नदी मुजविण्याचा प्रकार केला गेला आहे. या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.डफळे संस्थान काळापासून महत्व असलेली गंर्धव नदीचे पात्र भले मोठे होते.मात्र कालातंराने अतिक्रमणामुळे नदीचा नाला करण्यात आला आहे.नगर परिषद कार्यालय ते मटण गल्लीपर्यत गतवेळच्या पदाधिकाऱ्यांनी नदीचे बांधकाम केले आहे.तेथे काही प्रमाणात नदीचे पात्र मोठे आहे.मात्र मटण गल्लीला जाणार फुल - संभाजी चौक,पुढे सातारारोड पर्यत नदीतभराव टाकून मुजविण्यात आले आहे. तेथे चार फुटाचा नाला उरला आहे.एका पदाधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.देश राज्यपातळीवर नदीच्या अस्तित्व जीवंत ठेवत पुर्नजिवन करण्यासाठी शासन कोट्यावधाचा निधी खर्च करत असताना जत शहरात मात्र नदीला नाला करण्यात आला आहे.शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मटण गल्लीतील पुलापर्यतच्या या नदीला एका बाजूने खोक्याच्या अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.तर दुसऱ्याबाजूने प्लॉट पाडण्यासाठी थेट नदीपात्रात भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे नदीचा  पात्र मुजले असून चार फुटाचा नाल्यासारखी आवस्था झाली आहे. 
त्यापुढे सातारा रोडपर्यतही अशी आवस्था झाली आहे.भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास मोठ्या हानीला सामोरे जावे लागणार आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात यात लक्ष घालून नगरपरिषदेकडे नोंदी प्रमाणे नदी पात्र कायम ठेवावे अशी मागणी होत आहे.
 
जत नगरपालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने जतला नरकपालिका करत आहेत.शहरातील गंधर्व नदीचे शुभोभिकरण करण्याऐवजी नाला करण्याचा उद्योग बंद करावा,अन्यथा तीव्र आंदोलन करू 
विक्रम ढोणे,युवक नेते
 
 
जत शहरातील गंधर्व नदीचे एका ठिकाणे मोठे पात्र,तर दुसऱ्या ठिकाणी झालेला नाला
  
Blogger द्वारे प्रायोजित.