Header Ads

जतच्या वैद्यरत्न : डॉ.मनोहर मोदी



 


जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील परिवर्तन आणणारे वैद्यकीय क्षेत्राला लाभलेले कर्तबगार व्यक्तिमहत्व म्हणजे डॉ. मनोहर शिवाप्पा मोदी हे होत.जत शहरात कधी काळी वैद्यकीय उपचार मिळत नव्हते त्यावेळी त्यांनी जत शहरात दवाखाना काढून ग्रामीण भागातील जनतेला अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध करून दिल्या होत्या.या वैद्यरत्नाचा एक फेब्रुवारी हा जन्मदिवस, त्यांना 76 व्या जन्मदिनानिमित्त उदंड आरोग्य,आयुष्य व यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..!




डॉ.मोदी यांनी मिरज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस व पुणे येथे एम.एस.सर्जन ही पदवी प्राप्त करून शहराऐवजी ग्रामीण भागात येऊन येथील गोर गरिबांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.त्या आजतागायत अखंड सुरू आहेत.ग्रामीण भागातील पहिला सर्जन डॉक्टर म्हणूनही त्यांच्या नावाची ख्याती सर्वश्रूत आहे.राजकीय,सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रासह त्यांनी आपला कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्याला प्रेरित होऊन श्री.सिद्धरामेश्वर जनकल्याण प्रतिष्ठान, हिरेमठ,यांच्यातर्फे "वैद्यरत्न पुरस्कार' देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.जत तालुक्यातील कुंभारी गाव हे डॉ. मनोहर मोदी यांचे मूळ जन्म गाव आहे.वडील शिवाप्पा मोदी हे प्रसिद्ध अडत व्यापारी म्हणून तालुक्यात ओळख आहे. डॉ.मनोहर मोदी यांचे प्राथमिक शिक्षण कुंभारी येथे तर माध्यमिक जत,उच्च माध्यमिक सांगली येथे झाले आहे.सन 1969 रोजी मिरज मेडिकल कॉलेज येथून एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले. सन1974 रोजी पुणे येथे एम.एस.जनरल सर्जन म्हणून पदवी घेतली. यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टरी




पेशाला सुरुवात झाली. त्यांनी प्रथम शहराऐवजी आपल्या ग्रामीण भागात पॅक्टीस करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागाशी नाळ असणाऱ्या डॉ. मोदी




यांनी ग्रामीण भागात जाणारा पहिला डॉक्टर म्हणून आपला नावलौकिक मिळवला.सुरुवातील बिज्जरगी ऑईल मिल मध्ये प्रतिमहिना 15 ते 20 रुपयांमध्ये गाळा भाड्याने घेऊन आपली पॅक्टीस सुरू केली.त्यांच्या आजअखेरच्या 47 वर्षांच्या डॉक्टरी पेशामध्ये त्यांनी छोटी,मोठ्या व गुंतागुतीच्या दहा हजारहून अधिक रुग्णावर शस्ञक्रिया करून त्यांना जीवदान दिले आहे.ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांकडून कमी-अधिक मोबदल्यामध्ये त्यांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत.राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे नाव होते.जत सहकारी साखर कारखाना स्थापनेचे डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले आहे.जत मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडंट म्हणूनही त्यांनी काम केले तसेच जतमध्ये जॉइंटस् क्लब ऑफ जतची स्थापना केली. जत शहरात पहिली रक्तपेठी त्यांनी सुरू केली होती.आरोग्य शिबिरे,विविध डॉक्टरांच्या माध्यामातून जत तालुक्यातील नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याचा यज्ञ त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षीही कायम ठेवला आहे.यातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी घेतले होते.त्यांचे शैक्षणिक, सामाजिक,राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय आहे.सध्या त्यांचे चिरजिंव रोहन मोदी यांच्यावर डॉ.मनोहर मोदी हॉस्पिटलची जबाबदारी आहे.ते ती धुरा प्रभावी पणे पुढे चालवित आहेत.




 




शंब्दाकन : कनिष्क मोदी, जत



Blogger द्वारे प्रायोजित.