Header Ads

वाळू नव्हे सोनं | रात्री खुलेआम वाळु तस्करी सुरू



 


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात वाळू तस्करांनी धुमाकुळ घातला असून तालुुुक्यातील अनेक भागात रात्री खुलेआम वाळू तस्करीचा ‘कारभार’ सुरू आहे. वाळू माफियांनी निर्माण केलेल्या कृत्रीम वाळू टंचाईमुळे वाळूचे दर गगनाला भिडले असून सर्व सामान्यांना वाळू नव्हे हे तर सोनं असे म्हणण्याची वेळ आली आहे.रात्री पुर्व भागातून वाळूच्या गाड्या सर्रास धावत असून यांच्यावर कोणतेही कारवाई होत नसल्याने यात वाळू तस्करांना मोकळे ‘रान’ मिळाले आहे. वाळू माफियांवर कारवाई न करण्यासाठी काही अधिकार्‍यांचे ‘रेटकार्ड’ ठरले असून जे अधिकारी कडक भूमिका घेतात त्यांच्या घरापासून कार्यालयातपर्यंत ‘हेरगिरी’ केली जाते. यासाठी काही कर्मचारी घरचे ‘भेदी’ ठरत असून ते या तस्करांना व्यवहारीक मदत करीत आहेत. या माफियाला काही व्हाईट कॉलर पुढार्‍यांचा आशिर्वाद आहे. पावसाळा जवळ येत असल्याने वाळू साठा करण्यासाठी तस्करीच्या हालचाली वाढल्या असून त्यासाठी रात्रं-दिवस वाळू उपसा व वाहतुक सुरू आहे. वाळू माफियांच्या मुसक्या आवाळण्यासाठी कारवाईची मोहिम गरजेची आहे.

 

 

वाळू तस्करीचे अनेक ‘सुवर्ण’ मार्ग

 

उमदी परिसरातील बोर नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असून 20 च्या वर गाड्या रात्री वाळूंची अवैध वाहतूक करतात मात्र याकडे काही अधिकारी कानाडोळा करीत आहेत. जे अधिकारी कारवाईला जातात त्यांचेही हेरगिरी करण्यासाठी वाळू माफियांची एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून अधिकारी कार्यालय व घरातून निघाल्यापासून यांच्यावर पाळत ठेवली जाते. महसूल विभागातील अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असल्याने त्यांची वाळू माफियांशी ‘सलगी’ वाढली आहे. अवैध वाळू तस्कारांना पकडून त्यांना लाखों रुपयांचा दंड केला तरी त्यांची तस्करीची खोड गेलेली दिसून येत नाही. वाळूच्या टिप्पर व गाड्याला फळ्या लावून क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक केली जाते. या माफियांनी काही अधिकार्‍यांवर जीवघेणे हल्लेसुध्दा केली आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत.

 

 

ठेकेदार ‘नामधारी’ तर पुढारी ‘कारभारी’

 

 

सध्या वाळूचे दर गगनाला भिडले आहेत.चढ्या भावाने वाळू विक्री केली जात असून हे दर सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाहीत. वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण केली की अधिक दर मिळतो हे व्यवहारीक गणित आखून वाळू माफिया कार्यरत झाला आहे. वाळू बंद असेल तर इतकी वाळू येते कोठून हा सर्वसामान्यांना पडणारा हा साधा प्रश्न आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने तस्करी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाईची मोहिम हाती घेणे गरजेचे आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.