Header Ads

राजरोस मिळतोय गुटखा | कर्नाटकातून छुपी विक्री,अन्नभेसळचा पांठिबा ?




 


 



जत,प्रतिनिधी : राज्य सरकारने 2012 पासून गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे. प्रत्यक्षात मात्र कायदा धाब्यावर बसवून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस विक्री सुरूच आहे.बुधवारच्या जत पोलीसांनी केलेल्या कारवाईनंतर ते समोर आले आहे.अन्नभेसळच्या भ्रष्ठ अधिकाऱ्यांचा याला अर्थपुर्ण सहयोग असल्याचे आरोप होत आहेत.कर्नाटकातून छुप्या पद्धतीने गुटखा तालुक्यात पोहोचतो, तर सीमाभागासह राज्यातही अनेक ठिकाणी गुटखा निर्मितीचे अवैध अड्डे सुरूच आहेत. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेटसारख्या घातक घटकांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा समाना करावा लागतो. तंबाखुजन्य पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये, यासाठी राज्य सरकारने 2012 मध्ये गुटख्यासह तंबाखूजन्य सुपारी, पानमसाला याची निर्मिती आणि विक्री करण्यास बंदी घातली. या निर्णयाला सहा वर्षे उलटली, मात्र कायद्यातील पळवाटा आणि सरकारी यंत्रणांची नजर चुकवून गुटखा निर्मितीसह विक्रीही सुरूच आहे. अवैध गुटखा विक्रीकडे लक्ष वेधण्यासाठी आदोलने होतात. राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटख्याची राजरोस विक्री सुरूच कशी राहते? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित होत आहे.गुटखा बंदीचा कायदा कडक करण्यासाठी गुटखा तयार करणारे आणि विक्रेते यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितांना तीन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद केली आहे. प्रत्यक्षात मात्र कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने गुटखा विक्री सुरूच असल्याचे दिसते. गुटखा निर्मितीचे असे अनेक अड्डे आजही राज्यात सुरू आहेत. राज्यात विकला जाणारा बहुतांश गुटखा कर्नाटकातून छुप्या पद्धतीने आणला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात अनेक ठिकाणी गुटख्याची गोडाऊन आहेत. हा गुटखा विक्रेत्यांपर्यंत पोहोचवणारी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. कोट्यवधी रुपयांचा गुटखा रोज विक्रेत्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याची विक्रीही होते. दुकानांमध्ये माळा लटकवून विक्री होत नसली तरी छुपी विक्री कमी नाही. रस्त्यांवर पडणार्‍या रिकाम्या पुड्यांवरून याचा अंदाज येतो. गुटख्याला पर्याय म्हणून मावा खाल्ला जातो. माव्यातही तंबाखूचा वापर होत असल्याने तो तयार करणे आणि त्याची विक्री करणे बेकायदेशीर आहे. याकडे दुर्लक्ष करून सर्रास पान टपर्‍यांमध्ये मावा तयार करून विकला जातो. तरुणाईला माव्याचे व्यसन जडल्यामुळे पान टपर्‍यांवर नेहमीच गर्दी दिसते. मोठे वितरक या परिसरात कार्यरत आहेत.पोलील, अन्न व औषध प्रशासनाने गुटखा पकडल्यानंतर वितरकांसह निर्मिती करणार्‍यांपर्यंत पोहोचण्याचे धाडस दाखवण्याची गरज आहे. अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनाही आहेत. गुटखा निर्मिती, तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी संशयास्पद वाहनांची नियमित तपासणी करणे, गुटखा विकणार्‍या विक्रेत्यांवर कारवाईचे काम सातत्याने सुरू राहिल्यास गुटखा विक्रेत्यांना आळा बसू शकतो.


 

  

Blogger द्वारे प्रायोजित.