Header Ads

जत नगरपरिषदेकडे अग्नीशामक वाहन दाखल | तात्काळ आगीच्या घटना रोकणे होणार शक्य 


 

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेकडे अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आहे.अनेक दिवसाच़्या मागणीनंतर सुमारो 64 लाख रुपये खर्चुन सर्व प्रकारे सज्ज असलेले नवे अग्नीशामक वाहन घेण्यात आले आहे.यामुळे जत शहरासह तालुक्यासाठी आगीच्या घटना तातडीने रोकणे शक्य होणार आहे. बुधवारी ही गाडी नगरपरिषदेत दाखल आहे.

नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर म्हणाल्या की, पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या जत नगरपरिषदेची स्थापना 2012 साली झाली. जत शहरात किंवा तालुक्यात कुठे. आगीची दुर्घटना घडल्या तासगाव,मिरज शेजारील सोलापूर

जिल्ह्यातून अग्निशमन दलाच्या गाडीला बोलवावे लागत होते. जत नगरपरिषदेकड़े स्वतःच्या हक्काची अग्निशमन दलाची गाडी असावी यासाठी अशी मागणी होती.त्यानुसार गेल्या सहा महिन्यापुर्वी ही गाडी खरेदी करून अग्नीशामक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.या गाडीसाठी चालक व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची लवकरचं नेमणूक करण्यात येणार आहे.सध्या नगरपरिषेदच्या चालकांकडून गाडी हाताळण्यात येत आहे.भविष्यातील आगीच्या घटना तात्काळ रोकता येणें या अग्नीशामक गाडीमुळे शक्य होणार आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.