Header Ads

| माडग्याळ | माडग्याळ मधिल रस्त्यावरील विद्युत खांब धोकादायक


माडग्याळ मधिल रस्त्यावरील विद्युत खांब धोकादायक

माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथील मुख्य रस्त्यावर असलेला विद्युत खांब अपघाताला निमंत्रण ठरत आहे.जत-चडचण रोडवरचे काम करताना बाजूचे अतिक्रमण हटवून विद्युत पोल बाजूने लावण्याचे नियोजन होते.त्यासाठी विद्युत पोलही आणण्यात आला आहे.मात्र महावितरनच्या बेजबाबदार कारभारमुळे हा खांब जीवघेणी ठरत आहे.रस्त्याचे काम करताना हा खांब हलविण्याची गरज होती.मात्र लगतचे रस्त्यावर आलेले एका घराचे बांधकाम हटविले नाही.तेथून पुढे थेट रस्त्यावर हा खांब उभा आहे.रस्त्याचे काम झाल्याने वाहने भरधाव धावत आहेत.त्याशिवाय अवजड वाहने जाताना हा खांब धोकादायक ठरत आहेत.खांब बदलण्यासाठी नवीन खांब आणण्यात आला आहे.चुकून काही घटना घडण्याच्या अगोदर हा खांब बदलावा अशी मागणी आहे.
 

 

माडग्याळ ता.जत येथील थेट रस्त्यावर असलेला खांब धोकादायक बनला आहे.(छायाचित्र, रमेश चौगुले)
 


Blogger द्वारे प्रायोजित.