Header Ads

| जत | तुबची-बबलेश्वरचे उद्योग बंद करावेत ; माजी आ.विलासराव जगताप यांचा आ.सांवतांना टोला


 
 

 

तुबची-बबलेश्वरचे उद्योग बंद करावेत
 

माजी आ.विलासराव जगताप यांचा आ.सांवतांना टोल : जत भाजपचे राज्यव्यापी आंदोलन 

जत,प्रतिनिधी : तूबची- बबलेश्वर योजनेचे गाजर दाखवून जत तालुक्याच्या जनतेला फसविण्याचे उद्योग आ.सावंतांनी बंद करावेत, असे प्रतिपादन भाजपाचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत येथे केले.

जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जत तहसिलदार कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलनाचे लाक्षणिक उपोषण केले.याप्रसंगी भाषणात जगताप बोलत होते. या आंदोलनाचे नेतृत्व विलासराव जगताप यांनी केले.सकाळी दहा वाजता आंदोलनास सुरुवात झाली.यावेळी डॉ.रविंद्र आरळी, जि.प.महिला व बालकल्याण सभापती सौ. सुनिता पवार, पंचायत समिती सभापती मनोज जगताप, सुनिल पवार, जि.प.सदस्या रेखा बागेळी, सरदार पाटील,सदस्य रेखा बागेळी, सरदार पाटील,प्रभाकर

जाधव ,भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील

पवार,रासपचे अजित पाटील,भूषण

काळगी,डॉ.रविंद आरळी,गटनेते विजय

ताड,नगरसेवक उमेश सावंत,प्रकाश माने,तम्मासगरे,प्रमोद हिरवे,किरण शिंदे,संग्राम जगताप,पापा कुंभार,बाळ सावंत, सरपंच बसवराज पाटील,आर बी.पाटील माणिक वाघमोडे,आण्णा भिसे,सद्दाम अत्तार,शंकर वगरे,गौतम ऐवळे,विलास पाटील,राजेंद्र शिंदे,संतोष मोटे, डॉ.प्रवीण वाघमोडे,रमेश बिराजदार, राजू चौगुले,पवन मोरे,विजय पाटील,आप्पा शिंदे आदी भाजप व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक

उपोषणात भाग घेतला.

आंदोलकांच्या मागण्या अशा,शेतकऱ्याचा 7/12 उतारा कोरा करुन कर्जमुक्त करा. शेतकऱ्याची फसवणुक करु नका, बंद पडलेल्या म्हैशाळ योजनेचे काम तात्काळ सुरु करा, जत तालुक्यातरील पुर्व भागातील वंचित 48 गावांची विस्तारीत म्हैशाळ योजनेस मंजुरी द्यावी, गुहागर ते विजापूर रा. मा. क.165 मधील जत शहरालगतचे काम त्वरीत सुरु करा, सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक या महामार्गाची रुंदी नियमाप्रमाणे करा, महिलांवरील अत्याचार थांबवावेत, तालुक्यातील अवैद्य व सावकारी धंदे बंद करावेत, तुबची बबलेश्वर योजनेचे गाजर दाखवून जनतेला फसविण्याचे उद्योग बंद करावेत, जत शहरातील मंजुर असणारी व अर्धवट असणारी विकास कामे सुरु करा.

या सर्व मागण्या शासन स्तरावर मंजुर होऊन त्याची अंमलबजाणी व्हावी, या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

 

 जत शहरातील विजापूर-गुहागर


या रस्त्याचे काम त्वरित सुरू करणे आवश्यक असून हा रस्ता 22 मीटर अंतराचा आहे. या रस्त्यावर दुभाजक झाला पाहिजे.या रस्त्याची लांबी कमी करून आमदारांच्या बगलबच्यांच्या जागा वाचविन्याचा खटाटोप सुरू असून रस्त्याची रुंदी व दुभाजक रद्द करू देणार नसल्याचा इशारा माजी आमदार जगताप यांनी दिला.नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा 100 पानी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असताना त्याची चौकशी मुख्याधिकारी यांनी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय कसे काय देऊ शकते ? कारण ज्याठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे त्यांनाच चौकशी करण्याचे आदेश देणे हा विचित्र प्रकार आहे.या शासनाची कर्जमाफी ही

फसवी असून सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे अभिवचन दिले होते.ते सरकारने पाळले नसून जलयुक्त शिवार योजना बंद करण्याचा खटाटोप म्हणजे शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे स्पष्ट

दिसते येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेसह अन्य विकास कामासाठी किती निधी येतो पहावे लागेल.,असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

 

 

जतवर अन्याय होऊ नये,यासाठी मंञ्यांनी लक्ष द्यावे


 


जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मिरज

तालुक्यातील गावासाठी म्हैसाळ योजना मंजूर केली आहे.यामुळे 1200 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.मात्र जत तालुक्याच्या पूर्व भागातील वंचीत 48 गावांसाठी म्हैसाळ योजनेच्या विस्तारीत योजनेला मंजुरी द्यावी मगच मिरजेच्या

भागाला पाणी द्यावे.स्वर्गीय आर आर पाटील यांनी जत तालुक्याचा हक्काचा निधी पळवला होता.तेच काम मंत्री जयंत पाटील,विश्वजित कदम करणार असून याबाबत जत तालुक्यातील काँग्रेस

व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चमचेगिरी न करता तालुक्याच्या विकासासाठी पाठपुरावा करावा.1988 मध्ये मी जत तालुक्यात साखर कारखाना व म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी मोर्चा काढला होता.गरज नसताना त्यावेळीसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिमोर्चा काढला,सध्यासुद्धा तेच चालले आहे असा अप्रत्यक्ष टोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे हुशार आहेत त्यांना सर्व विषयाची जाण आहे.त्याबद्दल आमचे दुमत नाही.मात्र त्याचे वडील स्व राजारामबापू यांनी तालुक्यासाठी जी आत्मीयता दाखविली.तसे काम मंत्री पाटील यांनी करावे,अशी आपेक्षा आ.जगताप यांनी व्यक्त केली. 


 

 

जत येथे भाजपच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 


Blogger द्वारे प्रायोजित.