Header Ads

| जत | वळसंग - कोळीगिरी रस्त्याचे काम कधी होणार ?


 
वळसंग - कोळीगिरी रस्त्याचे काम कधी होणार ?

जत,प्रतिनिधी : वळसंग ते कोळीगिरी दरम्यानच्या रस्त्याचे काम कधी होणार असा सवाल वाहन धारकातून होत आहे. रस्ता कामासाठी खड्डीही टाकण्यात आली आहे. 
जत-चडचण रोडवरील वळसंग पासून जतकडेच्या दोन किलोमीटर ते कोळीगिरी पर्यतचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.खड्ड्याचा घेर वाढला होता.संबधित विभागाकडून खड्डे भरण्याचे सोपस्कर पुर्ण केले आहे.मात्र त्यात रोलिंग व दर्जा नसल्याने पुऩ्हा खड्डे पडले आहेत.तर रोलिंग नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चढ-उतार तयार झाले आहेत.त्यातून वाहने चालविताना मोठ्या अडचणीचे ठरत आहे.चढ-उतारामुळे दुचाकी स्वारांना कबरेचे आजार बळावू लागले आहेत.या रस्त्याच्या कामासाठी खड्डीही टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता मंजूर झाल्याचे दिसते.मात्र खड्डी टाकून अनेक महिन्याचा कालावधी झाला तरीही अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.तातडीने रस्त्याचे काम करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा संतप्त नागरिक व वाहन चालकांनी दिला आहे.

 

 

वळसंग-कोळीगिरी रस्त्याची झालेली आवस्था
 


Blogger द्वारे प्रायोजित.