Header Ads

विजापूर-गुहागर मार्गाचे शहरातील अखेर काम सुरू

 जत,प्रतिनिधी : बहुचर्चित असलेल्या विजापूर-गुहागर महामार्गाचे अनेक महिन्यापासून रखडलेले जत शहरातील काम अखेर बुधवार (ता.22)पासून सुरू झाले.

शहरातील पाण्याची पाईपलाईन,गटारी,फायर केबल,विद्युत खांब आदी कारणामुळे रखडलेले हे काम यापुर्वीच होणे गरजेचे होते.मात्र नगरपरिषद,महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार यांच्या अनेक बैठका होऊनही शेगाव चौक ते बसवेश्वर चौकापर्यकचे काम सुरू झाले नव्हते. यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांनीही विधानसभा निवडणूकी अगोदर अनेक बैठका घेत पाठपुरावा केला होता.विधानसभा निवडणूकीनंतर नुतन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी तातडीने हे काम करण्याचे आदेश दिले होते.अखेर बुधवारी या मार्गाचे कामावर मशिनी सुरू झाल्या आहेत.सर्व अडचणी दुर झाल्यास दोन-तीन महिन्यात पुर्ण काम होणार आहे.वाहतूक कोंडी,धुळ,खड्ड्यामुळे वैतागलेल्या जत करातून समाधान व्यक्त होत आहेत.

 

 

जत शहरातील रखडलेल्या महामार्गाचे अखेर सुरू झाले आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.