डफळापूरात काळी-पिवळींचा रस्त्यावर ठिय्या | या गाड्यांना जत पोलीस आवरणार का ?


 

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी हटण्याचे नाव घेत नाही.गुरूवारी जत पोलीसाच्या पथकांने सिंघम स्टाईल कारवाई केल्यानंतर शुक्रवारी काळी-पिवळी वडाप वाहने थेट रस्त्यावर उभी करून प्रवाशी भरत होती.त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

जत-सांगली मार्गावरील महत्वाचे गाव असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.याबाबत वारवांर तक्रारी येऊ लागल्याने जत पोलीसांनी डफळापूर बाजाराकडे मोर्चा वळविला.तब्बल तासभर सिंघम स्टाईल कारवाई केली.अनेक वाहनावर कारवाई करत दंडही वसूल केला.मात्र ही कारवाई ओट घटकेची ठरली.शुक्रवारी सकाळपासून थेट रस्त्यावर काळी-पिवळी गाड्या लावून प्रवाशी भरण्यात येत होते. जत-सांगली रोड वर असणाऱ्या या मार्गावर काळी-पिवळी गाड्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.पोलीस आम्हाच्यावर कारवाई करणारचं नाहीत असे काही वाहन चालकांनी छातीठोकपणे सांगितले.त्यामुळे अशा वाहतूकीला अभय आहे काय व रस्ता अडवणूक करणाऱ्या काळी-पिवळी गाड्यावर जत पोलीस खरचं कारवाई करणार का याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

 

 

डफळापूर ता.जत येथे थेट रस्त्यावर उभ्या केलेल्या काळी-पिवळी वाहनामुळे सातत्याने वाहतूक कोंडी आहे.