Header Ads

सिंघम स्टाईल बदली,जतेत अवैध धंदे सुरू


जत,प्रतिनिधी : जत पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी बऱ्यापैकी बदलून नवीन पोलीस अधिकारी व कर्मचारी रुजू झाले आहेत. वास्तविक पाहता अवैध धंदे बंद आहेत असा गाजावाजा होत आहे.परंतु कोणत्याही ग्रामीण भागातील गावामध्ये गेल्यानंतर जुगार मटका, दारू विक्री इत्यादी प्रकार सर्रास पाहावयास मिळतात. या सर्व गोष्टीला पोलीस खाते

जबाबदार आहे, यात शंकाच नाही. खरे तर जे धंदे अवैद्य आहेत त्यातून हे चालवण्यासाठी संबंधित खात्याला चिरीमिरी मिळते आहे. यात शंका नाही. एकमेकांच्या आश्रयाने हे धंदे तेजीत चालू आहेत. वास्तविक पाहता जे धंदे वैद्य आहेत आशा ठिकाणी अधिकारी वर्ग त्यातून हि आपणाला चार पैसे मिळाले पाहिजेत या भावनेपोटी त्या धंद्यांना हि अवैध धंद्याचे रूप त्यांनी आणल्याचे दिसून येते आहे. उद. शासन मान्य बिअर शॉपी मध्ये राजरोसपणे विदेशी व देशी मद्य विक्री करण्यास सदर परवाना धारकाला प्रवृत्त करणे व त्या मधून मासिक हप्ता घेऊन दुर्लक्ष केले जात आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.