Header Ads

गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त वाहनांचा जाहीर लिलाव


 




 

 

गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त वाहनांचा जाहीर लिला

 

उमदी,वार्ताहर : संख(ता.जत)अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत संख उमदी येथील अवैधरित्या गौण खनिज वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या 32 वाहनांचा दि.28 फेब्रुवारी 2020 रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.

अनधिकृत गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त करण्यात आलेली वाहने संख उमदी पोलिस ठाण्यात लावण्यात आलेली आहेत. त्या सर्व 32 वाहनांचा जाहीर लिलाव 28 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कमीत कमी किम्मत आकारण्यात येणार आहेत. दि 28 फेब्रुवारी रोजी संख तहसील कार्यालय ठिकाणी सकाळी अकरा वाजता हा लिलाव होणार असल्याने, या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी 5000 रुपये रक्कम डी.डी ने अथवा रोक रक्कम भरून सहभागी होता येणार आहे. तसेच लिलाव नंतर ठराविक रक्कम भरून आपला वाहनावरील ताबा निश्चित करावा, त्यासाठी इच्छुकांनी संख अप्पर तहसील कार्यालय संख येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

त्याचबरोबर अनधिकृत गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त करण्यात आलेली अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये अढळून आलेली 110 ब्रास वाळू संख अप्पर तहसील व उमदी पोलिस ठाणे आवारात आहे. त्याचाही लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली. यामध्ये वाळूची कमीत कमी किम्मत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ठरविण्यात आली आहे. प्रति ब्रास 5405 रूपये ठरविण्यात आली आहे. लिलाव वेळी 20 टक्के रक्कम जमा करावी. नंतर पूर्ण रक्कम जमा केल्यानंतर वाळूचा ताबा देण्यात येईल अशी माहिती संखचे अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.

 

 

संख अप्पर तहसील कार्यालयाकडून जप्त केलेल्या या वाहनाचा लिलाव होणार आहे.




 


Blogger द्वारे प्रायोजित.