राजे रामराव महाविद्यालयात औषधी वनस्पती ओळख व संवर्धन कार्यशाळा
राजे रामराव महाविद्यालयात औषधी वनस्पती ओळख व संवर्धन कार्यशाळा 
जत,प्रतिनिधी : राजे रामराव महाविद्यालय, जत येथे दि.28 फेब्रुवारी, 2020 रोजी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' निमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, सायन्स असोसिएशन व अंतर्गत गुणवत्ता तपासणी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "औषधी वनस्पती: ओळख व संवर्धन" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा, औषधी वनस्पती प्रदर्शन तसेच दि न्यू काॅलेज, कोल्हापूर मधील वनस्पतीशास्त्रज्ञ डाॅ. विनोद शिंपले यांचे "पश्चिम घाटातील औषधी वनस्पती संपदा' या विषयावर व्याख्यान आयोजीत केले आहे. तरी सदर कार्यक्रमाला जत परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक, नागरिक यांनी उपस्थित राहून दुर्मिळ औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग याबद्दल ची माहिती घ्यावी असे आवाहन प्र.प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे व वनस्पती शास्त्र विभागप्रमुख डाॅ. राजेंद्र लवटे यांनी केले आहे.