Header Ads

| उमदी | 'फेसाटीतील काका' सोपान गोरे यांचे निधन

'फेसाटीतील काका' सोपान गोरे यांचे निधन

उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील निगडी बुद्रुकचे रहीवाशी आणि फेसाटीसाठी मिळालेल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. नवनाथ गोरे यांचे वडील सोपान गोरे (फेसाटीतील काका) वय-८४ यांचे काल अल्पश: आजाराने पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन अविवाहित मुले , चार विवाहित मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी होणार आहे.

सोपान गोरे हे सर्वसामान्य शेतकरी  मजूर कुटुंबातील असून मोलमजुरी आणि काबाडकष्ट करून आपल्या मुलांना जगवले आहे. काही प्रसंगी त्यांनी ऊसतोडणीला जाऊन प्रसिध्द फेसाटीकार नवनाथ गोरे यांना मोठ्या कष्टाने शिकवले आहे.नवनाथ गोरे हे एक तरुण मराठी लेखक आहेत. त्यांना त्यांच्या 'फेसाटी' या कादंबरीसाठी 2018 सालचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी याच कादंबरीला मनॊरमा साहित्य मंडळीकडून, सोलापूरच्या मनोरमा साहित्य परिषदेचा स,रा. मोरे ग्रंथालयाचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या आधी नवनाथ गोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, लातूर, वर्धा येथील बाबा पद्मनजी प्रदीपराव दाते पुरस्‍कार असे एकूण दहा पुरस्‍कार मिळाले आहेत.फेसाटीतील सोपान काकांचे 

स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही. मोठया जिद्दीने त्यांनी आपल्या कुटुंबाला जीवनात उभा  केले आहे. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचे पक्के घर  बांधायचे झाले नाही.  शेवटी त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले  ही खंत मात्र त्यांच्या मनात शेवटपर्यंत सलत राहिली.अधुऱ्या स्वप्नांचा प्रवास अन् प्रत्येकवेळी (दवाखान्यात असतानाही) नाथा मास्तर आलं न्हायतं व्हयं  हा आपला मुलगा फेसाटीकार नवनाथला आदराने विचारलेला प्रश्न सगळ काही आज निशब्द झाला आहे. त्यांच्या अकाली निधनाने उमदी, निगडी बुद्रुक व जत तालुक्यात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.