Header Ads

'हम भी किसीसे कम नही',मॉडर्न स्कूलचे धमाकेदार स्नेहसंमेलन


जत,प्रतिनिधी : 'हम भी किसीसे कम नही', खरचं अगदी असाच सोहळा मॉडर्न नर्सरी स्कूल जत येथे पार पडला.स्कूलच्या चिमुकल्यांचा उत्साह,तगडे नियोजन,मेहनत अगदी ड्रेसिंग पासून ते स्टेज प्रेजेंटेशन पर्यंत कुठेच संयोजकांनी कमतरता पडू दिली नाही.या नियोजनाला प्रणव आलाट,शुभम घोडके पाटील,प्रतिक सोलापुरे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.श्रीदेवी सोलापुरे,दिलीप सोलापुरे,मल्लिकार्जुन सोलापुरे यांची साथ मिळाली.जत शहरात कमी कालावधीत नावलौकिक मिळविलेल्या मॉडर्न स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा एकाद्या फिल्मला शोभेल असा कार्यक्रम नुकताच पार पडला.यावेळी सौ व श्री. सिद्धलिंगप्पा सोलापुरे यांच्याहस्ते कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.सौ.व श्री.सिद्रामप्पा उमदीकर,सचिन उमदीकर,इरेश लोणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.सौ.सविता सोलापुरे म्हणाल्या,जत शहरात आपल्या चिमुकल्याच्या उच्चतम शिक्षणसाठी आम्ही संपूर्ण शिक्षण ऍक्टिव्हिटी बेस्ड असून मुलांचे शारीरिक, बौद्धिक विकास कसा करता येईल यावर अधिक भर दिला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम हा हसत खेळत शिकत असतांना न कळत मुले इथे घडतात, हीच खरी मॉडर्न स्कूलची जमेची बाजू आहे.स्कूलच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाबरोबर सर्व प्रकारची जडणघडण येथे होते. सौ.सारिका लोणी व श्रीशा लोणी यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी खूप उत्कृष्टरित्या पार पाडली.सिद्ध - प्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.सोलापुरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची नियोजनबद्ध आखणी केली.त्यामुळे शिर्षक नावाप्रमाणेच "हवा फक्त आमचीच "असे काहीसे चित्र कार्यक्रम स्थळी होते. 
 
जत येथील मॉडर्न स्कूलच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रंसगी मल्लिकार्जुन सोलापुरे,सिद्रामप्पा लोणीकर,दिलीप सोलापुरे  


Blogger द्वारे प्रायोजित.