Header Ads

नाभिक महामंडळच्या बैठकीमध्ये 'लेक वाचवा' अभियानाचा गजर


 




नाभिक महामंडळच्या बैठकीमध्ये 'लेक वाचवा' अभियानाचा गजर

माडग्याळ,वार्ताहर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जत पूर्व व पश्चिम भाग कार्यकारिणी बैठक माडग्याळ येथे संपन्न झाली.

या बैठकीमध्ये 'लेक वाचवा अभियान' जावळ मोफत,विद्यार्थी दत्तक योजना,गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत करणे, वर्षातून शाळेमध्ये जाऊन गरीब विद्यार्थ्यांचा केस कापत मोफत सामाजिक बांधिलकी जपणे अशाप्रकारे नाभिक महामंडळाकडून वेगवेगळे योजना राबवण्यात येणार आहे.या संघटना तीस-पस्तीस वर्षे झाले स्थापना होऊन समाज हितासाठी काम केले जात आहे.जत तालुका विस्ताराने मोठा आहे.त्यामुळे महामंडळाचे कार्य येथील लोकापर्यत पोहचत नाही.पुर्व भागामधील संख अप्पर तहसील कार्यालय हे वेगळे विभाग धरून अध्यक्ष,उपाध्यक्ष व सचिव पदाचे विस्तारीकरण केले.पूर्व भागाचे नाभिक समाजाचे अध्यक्ष राजू गुड्डापूर, उपाध्यक्ष मंजुनाथ नापीक व ज्योतीराम भोसले निवड करण्यात आली.वीर शिवा काशिद श्री संत हडपद आप्पां यांच्या प्रतिमेला पुष्पहार गुरू कोरे याच्यांहस्ते अर्पण करण्यात आले.जिल्हा सदस्य नंदकुमार खंडागळे,तालुका अध्यक्ष भजन केले,सचिव पांडुरंग काशीद,विठ्ठल  हडपद व समाज बांधव उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडला.

 

 

जत पुर्व भागातील नाभिक संघटनेच्या वतीने समस्याचे निवेदन देण्यात आले.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.