Header Ads

CM सडक योजनेच्या कामांची गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करा : विक्रम ढोणे

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत. त्यापैकीच कोट्यावधी रुपये खर्चून सोन्याळ-अंकलगी रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेतून चार किलोमीटरचे डांबरीकरण करण्यात आले आहे. हा रस्ता अत्यन्त निकृष्ट आणि नियमबाह्य करण्यात आले आहे.याशिवाय जत तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सर्वच कामे ही अंदाजपत्रका प्रमाणे न करता कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना ठेकेदारांनी आर्थिक मायेपोटी हाताशी धरून कोट्यावधीचे कामे निकृष्ट दर्जाचे करुन बिले उचलण्याचे काम करीत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील जिल्हास्तरावरील अधिकारी  व कनिष्ठ अभियंत्याची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व मुख्य अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पुणे यांच्याकडे निवेदनाव्दारे  केली आहे.

यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या व्हसपेठ ते चडचण सिमेपर्यंत नुकतेच झालेल्या रस्त्याच्या रुंदीकरणानंतर  प्रत्येकी एका किलोमीटर अंतरावर गावागावाचे अंतर दर्शवणारे माईलस्टोन उभा करण्यात आले आहे.माईलस्टोन उभा करताना सपाट जमिनीवर खड्डा न करता उभा करून सिमेंट काँक्रीटचे जमिनीवर निकृष्ठ पद्धतीने बॉक्स करण्यात आले आहे. सिमेंट खडीचे मिश्रण करून सोडून दिले आहे.अशा कामाला काही दिवस पाणी मारून क्यूरींग करणे आवश्यक असते. असे असताना त्याला एकदाही पाणी मारून क्यूरींग करण्यात आले नाही.यावरूनच

 

माईलस्टोनचे काम किती  बेजबादारपणाने निकृष्ट दर्जाचे झाल्याने  संबधीत खात्याचा निष्काळजीपणा व दर्जा समजून येतो.निगडी ते काशीद वस्तीवरील कामावर कहरच केला जुन्या पुलावर नवीन पुल करत होते हेच याचे ज्वलंत उदाहरण आहे या कामावर कार्यकारी अभियंत्यांनी भेट देऊन सोपस्कार पार पाडले. अशाच पद्धतीने  मुख्यमंत्री सडक योजनेतून कोट्यवधी रुपये खर्चून जत तालुक्यात सोन्याळ-अंकलगी मार्गावरील उर्वरित चार किलोमीटर खडीकरण रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे. आसंगी जत ते लमाणतांडा, बाज ते विजयनगर कोकळे हद्द, बाज ते माधवनगरवाडी कुंभारी हद्द ही कामे अशाच पद्धतीने झाली आहेत.या रस्त्याचे काम कोणत्याही अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली झालेले नाही.या कामात उत्तम दर्जाचे डांबर वापरले नाही, आराखड्याप्रमाणे काम पूर्ण करण्यात आले नाही, खडी आणि मुरूम मातिमिश्रित वापरले आहे. डांबरासारखे  दिसणारे काळे ऑईल वापरण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शिवाय रस्त्यावर पुरेसे पाणी न मारता रोलिंग केले नाही.अतिशय घाईघाईने काम उरकण्यात आले आहे. शेवटचे लेयर डांबरीकरण (कार्पेट) करण्यापूर्वीच आतील बी बी एम लेयर उखडून बाहेर पडत होता. या रस्त्याबद्दल नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. या संपूर्ण डांबरीकरण कामाची गुण नियंत्रण विभाग पुणेकडून जत तालुक्यातील सर्वच रस्त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

अंकलगी-उटगी, हळळी-उटगी, बेलोंडगीसह तालुक्यात कोट्यावधी रूपयेचे रस्त्याचे कामे झाली आहेत आणि काहींची कामे सुरू असून या सर्व कामावर अंदाज पत्रकानुसार कामे न करता कसेही थातूर-मातूरपणे ठेकेदार काम करीत असून निकृष्ट दर्जाच्या कामाला वरिष्ठाचे मुकसंमत्ती असल्याने या रस्त्याची पुन्हा दूरावस्था झाली आणि आणि होत आहे.काही ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू असताना खडीकरणावर पुरेसे पाणी टाकून नियमानुसार रोलिंग केले जात नाही. गिट्टीऐवजी सर्रास ढबर व मुरुमाचा वापर करण्यात येत आहे तर काही ठिकाणी माती मिश्रीत मुरूमाचा उपयोग करण्यात आला आहे.चांगल्या दर्जाची डांबर न वापरल्यामुळे डांबर व  गिट्टीचा पकड निर्माण झाली नाही. परिणामी  बहुतांश मार्गावरील कामे केलेल्या ठिकाणी दुसऱ्या- तिसऱ्या आठवड्यातच रस्ते उखळू लागले आहे. सोन्याळ-अंकलगी रस्ता ही तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रस्त्यावर हॉटमिक्सने कामे न करता केवळ बि.बि.एम चे काम करून मक्तेदार व अभियंता यांनी संगनमत करून

रस्त्याची वाट लावल्यामुळे रस्ता उखडून जात आहे.बहुतांश जत तालुक्यातील सर्वच रस्त्याची तीच बोंब आहे. या कामाकडे सदरील कार्यकारी अभियंता तालुक्यातील कामावर फिरकतच नाहीत. ऑफिसमध्ये बसूनच सर्व कामांची सोपस्कार पूर्ण केले जाते. 

 

 

 

 

मुख्यमंत्री ग्राम सडक याजनेतील अधिकाऱ्यांचा या सर्व कामाकडे  पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.अनेक ठेकेदार हे राजकीय कार्यकर्ते असल्याने अधिकारी व कर्मचारी ठेकेदाराच्या दबावाखाली कार्यरत आहेत.त्यामुळे त्यांनी या सर्व रस्त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे.अनेक दिवस मंजूर असलेली कामे आर्थिक वर्षअखेर घाई गबडीत सोपस्कार पार पाडला जात आहे.रस्त्याच्या कामासाठी शासन कोट्यावधी रूपये खर्च करीत असले तरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकारी व कर्मचारी उटांवरून शेळ्या राखत असल्याने कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत.शासकिय निधी वाया गेल्यात जमा होत असून रस्ते ही 'जैसे-थे'च परिस्थिती निर्माण होत आहे.कामे थातूर-

माथूर आणि अंदाजपत्रानूसार होत नाहीत. काही ठिकाणी एका रात्रीत कामे पूर्ण केली आहेत कामांची मापे कमी तर कुठे अर्धवट,  कुठे निकृष्ट करून पैसे खाण्याचा गोरख धंदा सुरू आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जत तालुक्यातील झालेल्या सर्व  कामाची सखोल चौकशी करून संबधीत दोषी कार्यकारी अभीयंता व कनिष्ट अभियंता ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री , ग्रामविकास मंत्री मुख्य अभीयंता ग्रामसडक योजना पुणे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केले आहे.

 

 

जत तालुक्यातील रस्त्यावर बसविलेले किलोमीटरचे दगड रस्ते कामाची गुणवत्ता स्पष्ट करत आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.