Header Ads

निंरकारी फौंडेशनकडून 1320 सरकारी रूग्णालयाची साफसफाई 


 निंरकारी फौंडेशनकडून 1320 सरकारी रूग्णालयाची साफसफाई


निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या 66 व्या जयंतीनिमित्त उपक्रम


 जत प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर असलेल्या संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशनच्या वतीने संत निरंकारी मंडळाचे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे 66 व्या जयंतीनिमित्त संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन रजि.दिल्ली शाखा जत सेवादल युनिट क्रमांक 1161 यांनी ग्रामीण रुग्णालय जत येथे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविले देशभरामध्ये सुमारे 1320 रूग्णालयाची स्वच्छता करण्यात आली.जत रुग्णालयाच्या आतील भाग व बाहेरील संपुर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.त्याचबरोबर एस आर व्ही एम हायस्कुल जत येथेही स्वच्छता करण्यात आली.यामध्ये सुमारे 200 निरंकारी भाविक भक्त सेवादल महापुरुषांनी सहभाग घेतला.


दरम्यानच्या कालावधीत जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ.शुभांगी बन्नेनवर यांनी सदर अभियानास सदिच्छा भेट देऊन अभियानाचे कौतुक केले.


बन्नेनवर म्हणाल्या की, निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज सत्संगच्या माध्यमातून मनाबरोबर बाहेरचीही स्वच्छता करण्याची महान सेवा करीत आहेत.हे कार्य सर्वांनी मनापासुन करण्याचा कायमस्वरूपी ध्यास असावा तेव्हाच आपला देश स्वच्छ सुंदर होणार आहे आज समाजाला संत निरंकारी मंडळाची गरज आहे असे गौरोद्वार काढले.रुग्णालयाचे डॉ.अशोक मोहीते, एस आर व्ही एम हायस्कुलचे प्राचार्य श्री.कदम सर यांनी मंडळाच्या कार्याबद्दल कौतुक केले. जत शाखेचे प्रमुख जोतिबा गोरे यांनी नियोजन तर सेवादल संचालक संभाजी साळे यांनी आभार मानले.दुपारच्या सत्रामध्ये संत निरंकारी मंडळाचे प्राचारक सागरजी माने सांगली यांचे उपस्थितीत सत्संग सोहळा संपन्न झाला. सदगुरु बाबाजीचा जन्म 23 एप्रिल 1954 साली झाला.लहानपणापासूनच शांत प्रेमळ व सेवाभावी वृत्तीचे होते त्यांचे वडील तत्कालीन सदगुरु बाबा गुरुबचन सिंहजी यांची हत्या झालेनंतर त्यांना गुरुगादीवर बसविण्यात आले. त्यावेळी त्यांनी खुनाचा बदला खुनाने घ्यायचा असे काही भक्तगण म्हणत असताना सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी खुन का बदला जरुर लेंगे लेकीन रक्त नालीयोमे नहीं मानव के नाडियोमे बहाऐंगे असा प्रेमाचा व शांतीचा संदेश देऊन स्व:ता रक्तदान करून रक्तदान शिबीराची सुरुवात केली त्याचबरोबर स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबीर आपत्तीग्रस्थांना मदत इत्यादी सामाजिक कार्याला सुरुवात केली.या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सामाजिक व आर्थिक परिषदेवर कार्यकारी सल्लागार म्हणून नेमणुक केली.दरम्यानच्या कालावधीत बाबाजीना शांतीदुत पुरस्काराने सन्मानित केले असे सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणेची प्रेरणा घेऊन आपण आपले जिवन व्यतीत करण्याची गरज आहे असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी जाधव यांनी केले


 


Blogger द्वारे प्रायोजित.